भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी (24 सप्टेंबर) इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली. भारताने शेवटचा वनडे सामना 16 धावांनी जिंकून यजमान संघाला क्लीन स्वीप दिला. या सामन्यात इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला दीप्ती शर्माने ज्या प्रकारे धावबाद केले, त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मागील चार दिवसांपासून हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही.
दीप्तीने चार्लीला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. त्यानंतर भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दीप्तीने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तिने सर्वप्रथम चार्लीला याबाबत चेतावणी दिली होती आणि त्यानंतरच अशाप्रकारे बाद केलेले. आता इंग्लंडची माजी कर्णधार हीदर नाईटने दीप्तीच्या या विधानावर आक्षेप नोंदवला आहे.
1/2 The game is over, Charlie was dismissed legitimately. India were deserved winners of the match and the series. But no warnings were given. They don’t need to be given, so it hasn’t made the dismissal any less legitimate… https://t.co/TOTdJ3HgJe
— Heather Knight (@Heatherknight55) September 26, 2022
नाईटने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून लिहिले,
‘सामना संपला, चार्ली कायदेशीररित्या बाद झाली. भारतीय संघ हा सामना आणि मालिका जिंकण्यास पात्र होता. मात्र, त्याआधी कोणत्याही प्रकारची ताकीद देण्यात आली नव्हती. नियमानुसार हे वैध होते तर ताकीदीची गरजच नव्हती. नियमानुसार चार्ली धावबाद होती तर, भारताला आम्ही ताकीद दिली अशा खोट्या गोष्टी सांगून स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) मंकडींगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाणार आहे. त्यानुसार नॉन स्ट्राईकरचा फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर जात असेल, अशावेळी गोलंदाजाने त्या फलंदाजाला बाद केले तर ते अनाधिकृत ठरवले जात होते. आता त्याला धावबाद म्हटले जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! तानिया भाटियाच्या हॉटेल रुममधून खासगी साहित्याची चोरी; लंडनमध्ये घडली घटना
विरोधी संघाला धावा गिफ्ट करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाची साथ सोडून हार्दिक पंड्या निघालाय नवीन दौऱ्यावर, पाहा फोटो




