लॉर्ड्स| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सवर मिळवलेला भारताचा हा इतिहासातील तिसराच विजय ठरला.
या सामन्यात भारताने इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान दिले होते. पण इंग्लंडला दुसऱ्या डावात ५१.५ षटकात सर्वबाद १२० धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त जोस बटलर २५ आणि मोईन अली १३ यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.
भारतीय गोलंदाजांचे आक्रमण
भारताने दिलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच २ षटकात इंग्लंडला २ मोठे धक्के बसले. सलामीवीर रॉरी बर्न्स ४ चेंडूंचा सामना करुन शून्य धावेवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजच्या हातून पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर त्याला बाद केले. त्यानंतर पुढील षटकातील चौथ्या चेंडूवर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर डोमिनिक सिबलीला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून शून्यावर बाद केले.
यानंतर हसीब हमीद आणि जो रुटने इंग्लंडचा डाव सावरताना ४२ धावांची भागीदारी केली. पण हमीदला १६ व्या षटकात इशांत शर्माने बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. तसेच २२ व्या षटकात इशांतने बेअरस्टोला देखील २ धावांवर बाद केले. त्यामुळे टी ब्रेकपर्यंत इंग्लंची अवस्था ४ बाद ६७ धावा अशी झाली होती.
विशेष म्हणजे दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताने मोठे यश मिळवले. तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात म्हणजे डावाच्या २३ व्या षटकात इंग्लंडचा कर्णधार जो रुट ३३ धावांवर बुमराहविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था सध्या २४ षटकात ५ बाद ६८ धावा अशी झाली.
त्यानंतर जोस बटलर आणि मोईन अलीने इंग्लंडचा डाव सावरण्याता प्रयत्न केला. मात्र, ३९ व्या षटकात पहिल्या चेंडूवर सिराजने अलीला १३ धावांवर, तर त्यापुढच्याच चेंडूवर सॅम करनला शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे सामन्यातील रंगत आणखी वाढली.
पण, यानंतर बटलरला ऑली रॉबिन्सनने शानदार साथ दिली. त्यांनी ८ व्या विकेटसाठी ७६ चेंडूत ३० धावांची भागीदारी केली. मात्र, अखेर ही भागीदारी जसप्रीत बुमराहने रॉबिन्सनला ५१ व्या षटकात ९ धावांवर बाद करत तोडली. नंतर ५२ व्या षटकात बटलरला आणि जेम्स अँडरसनला मोहम्मद सिराजने बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
शमी-बुमराहची अर्धशतकी भागीदारी
दिवसाच्या सुरुवातीलाच रिषभ पंतच्या रुपात मोठा धक्का बसल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. अखेर भारतीय संघाने १०९.३ षटरांत २९८ धावांवर डाव घोषित केला. यासह भारताने इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे मोठे लक्ष्य दिले. डावाखेर शमी नाबाद ५६ धावा आणि बुमराह नाबाद ३४ धावांवर होते.
https://twitter.com/ICC/status/1427257691806830592?s=20
https://twitter.com/BCCI/status/1427256826433740806?s=20
https://twitter.com/ICC/status/1427255891653533699?s=20
बुमराह-शमीची अभेद्य खेळी
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच रिषभ पंतच्या रुपात मोठा धक्का बसल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. लंच ब्रेकपर्यंत शमीने अर्धशतक पूर्ण केले. तो ६७ चेंडूंवर १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावांवर आहे. बुमराहने त्याला यशस्वी साथ देत ५८ चेंडूंमध्ये ३० धावा चोपल्या आहेत.
यासह भारतीय संघाने लंच ब्रेकपर्यंत १०८ षटकांमध्ये २८६ धावा फलकावर नोंदवल्या आहेत. यासह भारताकडे २५९ धावांची आघाडी आहे.
https://twitter.com/BCCI/status/1427238460453056520?s=20
जसप्रीत बुमराह-मोहम्मद शमी यांच्यात अर्धशतकी भागिदारी
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. सुरुवातीलाच रिषभ पंतच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. पंत २२ धावांच्या खेळीनंतर ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ काही अंतराने ईशांत शर्माही (१६ धावा) पव्हेलियनला परतला. मात्र जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढत संघाच्या २५० पेक्षा जास्त धावा फलकावर नोंदवल्या आहेत. सोबतच ५० धावांची भागिदारीही साकारली आहे.
चौकारांचा वर्षाव करत १०० व्या षटकापर्यंत त्यांनी २५० धावांपर्यंत मजल मारली. हीच लय पुढे कायम राखत त्यांनी नवव्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारीही केली आहे. शमी नाबाद ३५ धावा आणि बुमराह नाबाद २३ धावांवर खेळत आहेत.
https://twitter.com/mipaltan/status/1427232868502179841?s=20
भारताला मोठा धक्का
भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि गोलंदाज ईशांत शर्मा फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. मात्र दिवसाच्या सुरुवातीलाच पाहुण्या भारताला मोठा धक्का बसला आहे. पंत काही मोठे फटके खेळल्यानंतर दिवसाच्या चौथ्या षटकात ऑलि रॉबिन्सनच्या चेंडूवर २२ धावा करुन झेलबाद झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने त्याचा झेल पकडला आहे.
रिषभच्या रुपात भारताने सातवी विकेट गमावली आहे. तो बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या १९४ धावा इतकी होती.
https://twitter.com/englandcricket/status/1427214576697757696?s=20





