इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना लाॅर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान भारताचा माजी गोलंदाज वेगवान गोलंदाज आशीष नेहरा हिंदी समालोचन करताना दिसत आहे. समालोचन करताना आशीष नेहरासोबत एक योगायोगाची घटना घडली आहे. समालोचनादरम्यान नेहरा असे काही बोलला आहे, ज्यानंतर समाज माध्यमावर तो ट्रोल होत आहे.
सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या फलंदाजीवेळी मार्क वुड ११० व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्यावेळी भारताकडून रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत होता.
तेव्हा आशीष नेहरा समालोचन करताना म्हणाला, “मार्क वुडकडे अप्रतिम गती आहे. यावेळी कमी आहे ती फक्त विकेटची. इंग्लंडला वाटते आहे मार्क वुडने विकेट घ्यावी आणि या जोडीला तोडावे.” आशीष नेहराने असे म्हणताच त्याच चेंडूवर मार्क वुडने रिषभ पंतची विकेट घेतली.
आशीष नेहरासोबत घडलेल्या या घटनेमुळे तो आता समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहे. एका समाजमाध्यमावरील वापरकर्त्याने त्याला ट्रोल करत म्हणले आहे, “शप्पत भावा… मला वाटलेच होते आता विकेट पडणार आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “हिंदी समालोचन नाही आता इंग्रजी समालोचन ऐका.” याव्यतिरीक्त आणखी अनेकांनी त्याला ट्रोल करत पनौतीही म्हटले आहे.
https://twitter.com/PrabS619/status/1426532523262185479?s=20
इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने वर्चस्व केल्याचे दिसते आहे. इंग्लंडचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाअखेरीस २७ धावांची आघाडी घेऊन ३९१ धावांवर समाप्त झाला. कर्णधार जो रूटने नाबाद १८० धावांची खेळी केली. सामन्यात कर्णधार जो रुट वगळता भारतीय फलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या दमदार खेळीमुळे ३६४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
इशांत अन् कर्णधार विराटने असा डावपेच आखून इंग्लंडच्या २ अष्टपैलूंचा केला गेम, व्हिडिओ व्हायरल
नॉटिंघम कसोटीचा हिरो लॉर्ड्समध्ये बनला विलेन, चाहत्यांवर आली ‘बुमराह प्लिज नो बॉल’ म्हणण्याची वेळ
दुखापतग्रस्तांना पुन्हा संधी तर बदली खेळाडूंचे कटणार तिकीट; बीसीसीआयच्या निर्णयाने खेळाडू पेचात






