भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर खेळला जात आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा या सामन्यात पुन्हा चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 9 धावा केल्या. यानंतर त्याच्यावर चहूबाजूंनी टिका होत आहे. यासह त्याच्या कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 126 धावांची ऐतिहासिक भागिदारी केली. रोहित 83 धावा करून बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा खेळाडू पुजारा फलंदाजीसाठी आला. यावेळी संघवर कसलाही दबाव नव्हता. म्हणून पुजाराजवळ स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही एक चांगली संधी होती. मात्र, पुजारा ते करू शकला नाही. पुजारा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसनच्या चेंडूवर केवळ 9 धावा करून झेलबाद झाला.
तत्पूर्वी पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, पुजाराची विकेट गमावल्यानंतर पूर्ण खेळ बदलला. भारतीय संघाने 97 धावांपर्यंत एकही विकेट गमावला नव्हता. पण पुढे रोहित बाद झाल्यानंतर 112 धावा होईपर्यंत संघाने 4 विकेट्स गमावल्या. पुजाराने या सामन्यात 16 चेंडूत केवळ 4 धावा केल्या होत्या.
तो 2019 नंतर कसोटीत एकही शतक करू शकलेला नाही. त्याने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019 मध्ये झळकावले होते. त्याने त्या सामन्यात 193 धावा केल्या होत्या. त्या मालिकेत पुजाराने सर्वाधीक 521 धावा केल्या होत्या. पुजाराच्या अप्रतिम खेळामुळे भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिली मालिका जिंकली होती.
https://twitter.com/rajni712dhoni/status/1425839473049235472?s=20
https://twitter.com/Krishna11503812/status/1425850896030724096?s=20
त्याच्या लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या खराब खेळीनंतर पुजारावर क्रिकेटप्रेमी चांगलेच भडकले आहेत. न्युझिलॅंड विरूद्धच्या जागतीक कसोटी अजिंकपदाच्या अंतिम सामन्यातही त्याला खराब प्रदर्शनामुळे प्रेक्षकांच्या टिकांना सामोरे जावे लागले होते. मात्र, चाहत्यांना विश्वास होता की, तो इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करेल. पण पुजारा येथेही काही कमाल करत नसल्यामुळे चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. अनेकांनी त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे.
#ENGvsIND
pls Pujara we have T20 WC ahead 🙏 pic.twitter.com/S25XVwgHin— Savage (@arcomedys) August 12, 2021
https://twitter.com/oldschoolmonk/status/1425839952093278217?s=20
high time now to make a biopic on Pujara and release both of them
— Arun Lol (@dhaikilokatweet) August 12, 2021
#ENGvsIND #Pujara
Pujara be like: pic.twitter.com/6GUNFMi8Kf— That funny guy (@OMKARKU35869614) August 12, 2021
End of an era . Thanks for the memories Che Pu @cheteshwar1 . If this won't be Pujara's last series,iam sorry Indian cricket is heading the wrong way #ENGvsIND . The way he gets out is even more worrying
— Aditya (@Aditya_062519) August 12, 2021
तसे तर, खराब फॉर्ममध्ये असतानाही पुजाराला भारतीय संघात खेळण्यासाठी आत्तापर्यंत अनेक संधी मिळाल्या आहेत. मात्र भारतीय संघाकडे तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंची कसलीच कमतरताही नाही. जर पुन्हा दुसऱ्या कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात पुजारा काही कमाल करू शकला नाही, तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्याजागी सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजाचा चौकार अडवण्यासाठी धावले अन् बाउंड्रीवर दोघांचेही लोटांगण, Video पाहून व्हाल लोटपोट
एकेकाळी विरोधात असणाऱ्या ब्रेंडन मॅक्कलमचा ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूला मदतीचा हात; म्हणाला…