इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सवर खेळला जात आहे. सामन्यादरम्यान लाॅर्ड्सच्या मैदानावर असे काही घडले आहे, ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू ढकलताना दिसला. त्यानंतर दुसऱ्या खेळाडूने त्याच्या पायाने चेंडू घासण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडियो व्हायरल झाल्यावर अेकांनी इंग्लंडचे खेळाडू चेंडूशी छेडछाड करत असल्याचे म्हटले आहे.
भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांनी या बाबतीत प्रश्न उपस्थित केले आहे. आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावात रेकॅार्ड झालेल्या या घटनेविषयी आतापर्यंत भारतीय संघाकडून कसलीही अधिकृत तक्रार केली गेली नाही. व्हिडिओत इंग्लंडच्या खेळाडूंचे चेहरे दिसत नाहीत आणि नंतर पंचांनीही चेंडू बदलला नाही. त्यामुळे काहींनी हे चेंडू छेडछाड प्रकरण नसल्याचे म्हटले आहे. भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर या घटनेविषयी त्याचे मत मांडले आहे. ते म्हणाले, “आम्ही हे खूप नंतर पाहिले. पण मला वाटत नाही की त्यांनी हे जाणूनबुजून केले आहे.”
राठोरपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडनेही इंग्लंडच्या खेळाडूंची बाजू घेत स्पष्टीकरण दिले होते. त्याला एका ट्विटर वापरकर्त्याने या घटनेवर त्याचे काय विचार आहेत? असा प्रश्न केला होता. त्यावर स्टुअर्ट ब्राॅडने स्पष्टीकरन देत ट्विटमध्ये म्हटले की, “वुड त्याच्या पायाने बॉलला चमकावण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याच्या पायाखाली आला. असे नेहमीच होते. त्याला चेंडूवर लाथ मारायची होती, पण तो चुकला. फोटोचा स्क्रीनशाॅट घेण्याच्या ऐवजी व्हिडिओ पूर्ण पाहा. सहजतेने आणि सावधानीने पाहा.”
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाला ३९१ रोखून भारतीय संघ फलंदाजी करायला मैदानात आला. मात्र, डावाची सुरुवात खराब झाली सलामीवीर फलंदाज केएल राहुलने १ धाव आणि रोहित शर्माने २१ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने २० धावा केल्या. भारतीय संघाने ३ विकेट केवळ ५५ धावांवर गमावल्या. पुढे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा जोडीने संघासाठी शकतीय खेळी केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हे दोघेही बाद झाले. रहाणे ६१ आणि पुजाराने ४५ धावा केल्या. जडेजा केवळ ३ धावा करून बाद झाला.
त्यानंतर पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला रिषभ पंतच्या रुपात भारताला मोठा धक्का बसला. तो २२ धावा करुन बाद झाला. मात्र फलंदाज चिवट झुंज देत मैदानावर टिकून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पराभवाची वाटतेय भिती; अनुभवी खेळाडू म्हणाला, ‘भारताने ५०-६० धावा केल्यास…’
बुमराहच्या एकामागून एक वेगवान बाउन्सर्सला त्रासला इंग्लिश क्रिकेटर, मैदानातच ऐकवली खरीखोटी