इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला हार पत्करावी लागली. या पराजयानंतर इंग्लंड संघावर दबाव वाढला आहे. इंग्लंडच्या या पराजयानंतर बेन स्टोक्सचे संघात पुनरागमन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बेन स्टोक्सने मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून अनिश्चीत काळासाठी विश्रांती घेतलेली आहे. इंग्लडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुडने मंगळवारी(१७ ऑगस्ट) याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
त्यानी स्पष्ट केले की इंग्लंडच्या लाॅर्ड्सवरील पराजयानंतही संघ बेन स्टोक्सवर पुनरागमनासाठी दबाव आणणार नाही. लाॅर्ड्सवर इंग्लंडला भारताने १५१ धावांनी मात दिली, त्यानंतर सिल्वरवुडने सांगितले आहे की स्टोक्सला मानसिक त्रासातुन बरे होण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्याला दिला जाईल. कर्णधार जो रूटनेही मालिका सुरु होण्यापूर्वी याबाबत असेच म्हटले होते.
सिल्वरवुडने म्हटले की, “आम्ही स्टोक्सला पुनरागमानासाठी नाही सांगणार. मला नाही वाटत की अशा बाबतीत तुम्ही दबाव बनवू शकता. मी वाट पाहिल, आम्ही त्याची तोपर्यंत वाट पाहू, जोपर्यंत तो स्वत: येऊन म्हणेल की मी खेळण्यासाठी तयार आहे.”
बेन स्टोक्सने मागच्याच महिन्यात पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघाने ३-० असा विजय मिळवलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर क्रिकेटमधून अनिश्चीत काळासाठी विश्रांती घेतली होती.
सिल्वरवुडने जो रूटचे समर्थन केले आहे की मानसिक स्वास्थ यासारख्या संवेदनशील मुद्याबाबत कोणावर दबाव बनवला जाऊ शकत नाही. तो पुढे बोलताना म्हणाला, “यात कोणतीच समयसीमा नाहीये. मी पुन्हा सांगतोय आमच्यासाठी स्टोक्सचे, त्याच्या परिवाराचे स्वस्थ राहणे महत्वाचे आहे, कारण तो दमदार पुनरागमन करू शकेल. आमच्यासाठी त्या स्थितीत पोहतणे गरजेचे आहे, जेव्हा तो पुनरागमन करण्याच्या आणि इंग्लंडसाठी चांगले प्रदर्शन करण्यासाठी स्वत:ला मानसिक रुपाने तयार समजेल.”
इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ बुधवारी घोषित केला जाऊ शकतो. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वुडला दुसऱ्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत तो खेळेल की नाही हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची पुन्हा बिघडली तब्येत, अर्ध्यातून सोडावा लागला कार्यक्रम
इंग्लंडमधील टीम इंडियाच्या मागील तिन्ही विजयाचे ‘अँडरसन कनेक्शन’, वाचा सविस्तर