भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारपासून (12 ऑगस्ट) सुरू झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा यष्टिरक्षक जाॅनी बेयरस्टो माध्यमांशी बातचीत करण्यासाठी आला होता. यावेळी तो मोहम्मद सिराजशी झालेल्या नोकझोकीविषयी बोलला आहे.
बेयरस्टोला पहिल्या कसोटीदरम्यान त्या घटनेविषयीही विचारले गेले; जेव्हा भरतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याला बाद केले आणि त्याच्या तोंडावर बोट ठेवत शांत राहण्याचा इशारा केला होता. यावर बोलताना बेयरस्टो म्हणाला, “आमच्यात काहिच झाले नव्हते. तो मला काहिच बोलला नाही. मला वाटत नाही की, तेथे काही विवादास्पद झाले होते.”
#Siraj removed #Bairstow! 🤫
Come on #TeamIndia 👏👏👏#ENGvIND #ENGvsIND #INDvENG #INDvsENG #cricketpic.twitter.com/U2RnHFJUMI— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) August 7, 2021
नॉटिंघम कसोटी सामन्यातून कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या बेयरस्टोने सांगितले की, मागचे काही महिने त्याच्यासाठी चांगले ठरले आहेत. यामध्ये इंडियन प्रिमीयर लिग (आयपीएल) आणि शंभर चेंडुंची द हंड्रेड या क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. नुकत्याच संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला होता. पहिल्या डावात त्याने २९ धावा आणि दुसऱ्या डावात ३० धावा केल्या होत्या.
तो पुढे बोलताना म्हणाला, “मी मैदानात पुरेसा वेळ घालवला .पण मोठी धावसंख्या बनवू शकलो नाही. मी त्या दोन डावांत जशी खेळी केली, तशी खेळी जर करत राहिलो तर मला वाटते मी मोठी धावसंख्या करू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटवर बांगलादेशच्या जल्लोषाचा व्हिडिओ पाहून पेटला वाद, कोचचाही चढला पारा
गांगुलीसोबत चर्चा करत असलेले ‘ते’ व्यक्ती कोण? आहे ‘हे’ खास नाते
विराट कोहलीच्या नेतृत्वात चुका शोधून काढणाऱ्यांना जड्डूचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…