सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकमेव कसोटी सामना बुधवारपासून (१६ जून) ब्रिस्टल येथे सुरू होत आहे. उभय संघ तब्बल ७ वर्षानंतर एकमेकाविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. मात्र, हा सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे त्या खेळपट्टीविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्यामुळे, इंग्लंड संघाची कर्णधार हीदर नाईट हिने नाराजी व्यक्त केली.
पुरवली गेली वापरलेली खेळपट्टी
भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला हा सामना ब्रिस्टलच्या मैदानावरील ज्या खेळपट्टीवर होणार आहे, त्या खेळपट्टीवर मागील शुक्रवारी ग्लुसेस्टरशायर विरुद्ध ससेक्स यांच्या दरम्यान टी२० सामना खेळला गेला होता. या संपूर्ण सामन्यात एकूण ३७ षटके गोलंदाजी केली गेलेली.
अशी वापरलेली खेळपट्टी दिल्यामुळे इंग्लंड संघाची कर्णधार हीदर नाईट निराश झाली. तिने या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “ही चांगली घटना नाही. महिला संघ देखील उत्कृष्ट खेळपट्टीचा हकदार आहे. आम्हाला खेळपट्टी बदलून मिळावी याबाबत आम्ही मागणी केली मात्र तोपर्यंत काहीसा उशीर झाला होता. आता जी खेळपट्टी मिळाली आहेत त्याच्यावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
ब्रिस्टल हे ग्लुसेस्टरशायर संघाचे घरचे मैदान आहे. सध्या इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट सीरिज सुरु असून यातील सामने या मैदानावर खेळले गेले आहेत.
इसीबीने मागितली माफी
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या घटनेविषयी बोलताना म्हटले, “आम्ही या गोष्टीबाबत खेद व्यक्त करतो. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीसाठी नवी खेळपट्टी उपलब्ध न करू शकल्याने आम्ही निराशा आहोत. मात्र, भविष्यात अशी गंभीर चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.”
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयला मोठा दिलासा! ‘त्या’ आयपीएल संघाला नाही द्यावे लागणार ४८०० कोटी रुपये नुकसान भरपाई
टीम इंडियातील ‘हे’ ३ खेळाडू पहिल्यांदाच घेऊ शकतात इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्याचा अनुभव
रोनाल्डोच्या एका व्हिडिओमुळे हंगामा, कोका-कोला कंपनीला २९३ कोटींचे नुकसान