न्यूझीलंडमध्ये सध्या चालू असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ मधील (ICC Women ODI World Cup 2022) सातवा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (WIW vs ENGW) यांच्यात झाला. वेस्ट इंडिजने ७ धावांनी हा सामना जिंकला. अखेरच्या क्षणी हा सामना खूप रोमांचक बनला होता. इंग्लंडच्या ८ विकेट्स गेल्यानंतर त्यांनाविजयासाठी ७० धावा पाहिजे होत्या. परंतु नवव्या विकेटसाठी केट क्रॉस आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली आणि त्यांनी इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले. परंतु त्या संघाला सामना जिंकून देऊ शकल्या नाहीत. दरम्यान वेस्ट इंडिजची खेळाडू ड्रेंडा डॉटिन (Deandra Dottin) हिने शानदार झेल (Best Cricket Catch) घेत दर्शकांचे लक्ष वेधले.
ड्रेंटा डॉटिनने पालटला सामना
त्याचे झाले होते असे की, प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने इंग्लंडला २२६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीर, लॉरेन विनफिल्ड हिल आणि टॅमी बाउमॉट यांनी ८ व्या षटकापर्यंत त्यांची विकेट वाचवून ठेवली होती. मात्र नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यांची जोडी तुटली. यात डेंड्रा डॉटिनचे महत्त्वाचे योगदान होते. ८.१ षटकात विनफिल्डने पाँईन्टच्या दिशेने ४ धावा करण्याचा विचार केला. तिचा शॉट अतिशय दमदार होता.
परंतु पाँईन्टवर उभा असलेल्या डेंड्रा डॉटिनने हवेत उडी मारत एका हाताने शानदार झेल टिपला. तिचा हा झेल प्रशंसनीय होता. अगदी आयसीसीनेही तिच्या झेलचा व्हिडिओ पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे.
https://www.instagram.com/reel/Ca3egvTlvGn/?utm_source=ig_web_copy_link
Deandra Dottin pulls an absolute screamer#CWC22 pic.twitter.com/tsUdjMBOL9
— a. (@lapulgaprop_) March 9, 2022
असा झाला वेस्ट इंडिज वि. इंग्लंड सामना
दरम्यान या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी झटपट धावा करत संघाची धावसंख्या २२५ वर नेली. वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक शेमेन कॅम्पेबेल हिने सर्वाधिक ६६ धावा केल्या. ८० चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या मदतीने तिने ही अर्धशतकी खेळी केली. तिच्याबरोबरच चिडन नेशनने नाबाद ४९ आणि हिली मॅथ्यूजने ४५ धावांचे योगदान दिले. तसेच सलामीवीर डेंड्रा डॉटिन हिनेही ३१ धावा जोडल्या.
वेस्ट इंडिजच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २१८ धावात करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी बाउमॉटने सर्वाधिक ४६ धावा चोपल्या. तर सोफी डंक्ले (३८ धावा), सोफी इक्लेस्टोन (३३ धावा) आणि डॅनियल वॉट (३३ धावा) यांनाच ३० धावांचा आकडा ओलांडता आला. इंग्लंडच्या इतर फलंदाज साध्या ३० धावाही करू शकल्या नाहीत. परिणामी वेस्ट इंडिजने ७ धावांनी हा सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजने ७ धावांनी इंग्लंडचा उडवला धुव्वा, नोंदवला विश्वचषकातील सलग दुसरा विजय
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, पण मिताली-मंधानाच्या क्रमवारीत ‘इतक्या’ स्थानांची घसरण
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ संघाची काय आहे ताकद अन् कमजोरी, जाणून घ्या सर्वकाही