ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी२० टूर्नामेंट बिग बॅश लीगचा दहावा हंगाम खेळला जात आहे. बुधवारी (२३ डिसेंबर) या हंगामातील तेरावा सामना ऍडलेड स्ट्राईकर्स आणि ब्रिसबेन हिट संघात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड स्ट्राईकर्स संघाने ६ बाद १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रिसबेन हिटचा अर्धा संघ १० षटकांच्या आतच पव्हेलियनला परतला. त्यानंतर १२व्या षटकात पंचाच्या एका चुकीच्या निर्णयाला त्यांना सामोरे जावे लागले आणि परिणामत: त्यांनी अवघ्या २ धावांनी सामना गमावला.
झाले असे की, ऍडलेड स्ट्राईकर्स संघाचा गोलंदाज डॅनी ब्रिग्स डावातील १२वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रिसबेन हिटचा फलंदाज टॉम कूपरने स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मारलेला चेंडू बॅटला लागून पॅडवर येऊन धडकला. यावर गोलंदाजाने पायचीतसाठी अपील केली आणि पंचाने चक्क फलंदाज पायचीत असल्याचे घोषित केले.
Oh my… HOW was this given out?!?! 😱#BringtheHEAT #BBL10 pic.twitter.com/QpvSKYc8vq
— Brisbane Heat (@HeatBBL) December 23, 2020
हे पाहून सामन्याचे समालोचन करत असलेले ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न यांनाही आश्चर्य वाटले. “हे देवा! पंच कशाप्रकारची पंचगिरी करत आहेत. हा नुसता हलगर्जीपणा आहे. याचे काही-ना-काही केलेच पाहिजे. बस आता खूप झाले. आम्ही अशा खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत,” असे शब्द वॉर्न यांच्या तोंडून निघाले.
बिग बॅश सामन्यातील या घटनेला पाहिल्यानंतर केवळ वॉर्न थक्क झाले नाहीत. तर इतर क्रिकेट दिग्गजांपासून ते चाहत्यापर्यंत सर्वांना आश्चर्य वाटले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल यानेही ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. तसेच अनेक क्रिडा पत्रकारांनीही पंचांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला.
Not again 🤦🏻♂️
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) December 23, 2020
Wow. There have been some true howlers in the #BBL10 and that was one of them…
— Melinda Farrell (@melindafarrell) December 23, 2020
Has the case for the DRS in the Big Bash ever been stronger? #BBL10
— Scott Bailey (@ScottBaileyAAP) December 23, 2020
I mean, never mind the nick, how on earth was that hitting a stump?!?!#BBL10
— Brett McKay (@BMcSport) December 23, 2020
पंचांच्या चुकीच्या निर्णायामुळे ब्रिग्स २४ चेंडूत २ चौकारांसह २४ धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर ब्रिसबेन हिट संघाचा कर्णधार जिम्मी पिर्सन याने नाबाद ६९ धावांची खेळी करत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही आणि अवघ्या २ धावांनी ब्रिसबेनला परभावाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित आगरकर का नाही बनला टीम इंडियाचे निवडकर्ता? घ्या जाणून
…म्हणून ऍलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा पश्चाताप
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! यंदा एक-दोन नव्हे तर तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने होणार