डॉन ब्रॅडमन! हे नाव माहीत नाही असा एकही क्रिकेटप्रेमी शोधून देखील सापडणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीतील बहुतांशी विक्रम सर्वप्रथम त्यांच्या नावावर होते ते फलंदाज म्हणजे डॉन ब्रॅडमन. आपल्या अप्रतिम फलंदाजीने त्यांनी सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य केले. ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले मात्र १०० ची सरासरी कायम राखण्यासाठी त्यांना आपल्या अखेरच्या कसोटीत ४ धावांची आवश्यकता होती. मात्र, ते शुन्यावर बाद झाले आणि हा विश्वविक्रम बनू शकला नाही. ब्रॅडमन यांना त्या डावात तंबूत धाडले गोलंदाज होते इंग्लंडचे एरिक हॉलिस. आज हॉलिस यांची ११०वी जयंती आहे.
ब्रॅडमन यांना नाही खोलू दिले खाते
डॉन ब्रॅडमन हे १९४८ च्या ऍशेसनंतर निवृत्ती घेणार होते. ओव्हल येथील अखेरच्या कसोटीत उतरताना त्यांना कारकिर्दीत ७००० धावा करण्यासाठी व १०० ची सरासरी कायम राखण्यासाठी केवळ ४ धावा हव्या होत्या. मात्र, हॉलिस यांनी ब्रॅडमन यांना दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले आणि स्वतःचे नाव एका अजरामर केले.
या सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना आर लिंडवाल यांच्या भेदक गोलंदाजीपुढे केवळ ५४ धावांमध्ये सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने अर्थुर मॉरीस यांच्या १९६ धावांच्या जोरावर ३८९ धावा बनविल्या होत्या. सलामीवीर सीड बर्न्स बाद झाल्यानंतर ब्रॅडमन हे तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेले. लेन हटन यांच्या अर्धशतकानंतरही इंग्लंड दुसऱ्या डावात १८८ धावा करु शकला व त्यांना एक डाव व १४९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
अशी होती कारकीर्द
हॉलिस यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत केवळ १३ कसोटी सामने खेळले. लेगस्पिनर असलेल्या हॉलिस यांनी यामध्ये ४४ गडी बाद केले. ते प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वॉर्विकशायरचे प्रतिनिधित्व करत. आपल्या जवळपास २५ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ५१५ सामने खेळताना २३२३ बळी मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कौतुक करा कौतुक! क्रिकेटला मिळाला दुसरा युवराज, पठ्ठ्याने टी१० लीगच्या एका ओव्हरमध्ये ठोकले ६ षटकार
खासदार असूनही आयपीएलमध्ये काम का करतो? बोलणाऱ्यांना गंभीरची चपराक; म्हणाला, ‘मला कसलीही लाज नाही…’