गोल्ड कोस्ट | उद्यापासून सुरू होत असलेल्या काॅमनवेल्थ गेम्समध्ये २ लाख २५ हजार कंडोम, १७ हजार टॉयलेट रोल्स आणि फुकट आइसक्रिमची सोय करण्यात आली आहे.
येथील काॅमनवेल्थ व्हिलेजमध्ये अनेक ठिकाणी फुकट कंडोम देण्याची केंद्र बनवण्यात आली आहेत. प्रत्येक खेळाडूला ३४ कंडोम देण्यात येणार असून स्पर्धा ११ दिवस चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला दिवसाला ३ कंडोम दिल्याप्रमाणेच आहे.
काॅमनवेल्थ व्हिलेजमध्ये १२५० अपार्टमेंट खास खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. ही अपार्टमेंट २०१९ पासून विक्रीला काढली जाणार आहेत किंवा भाड्याने दिली जाणार आहेत.
३०० आचारी येथील भोजनालयात काम करत असून हे भोजनालय खेळाडूंसाठी २४ तास खूले राहणार आहे.
स्पर्धेला ६००० खेळाडू आणि अधिकारी उपस्थित राहण्याचा आयोजकांना विश्वास आहे.
रिओ आॅलिंपिकमध्ये ४,५०,००० कंडोमचे फुकट वाटप करण्यात आले होते तर हिवाळी आॅलिंपिकमध्ये १,१०,००० कंडोम खेळाडूंना देण्यात आले होते.