भारतीय क्रिकेट संघ आता जवळपास ३ महिने क्रिकेटपासून दूर आहे. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे आता आयपीएल संपली देखील असतील. यामुळे सध्या सर्वच भारतीय क्रिकेटपटू घरी आहेत.
पाठीमागे भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने आपण परिवारासोबत वेळ घालवत असल्याचे सांगितले होते. आज रहाणेने आणखी एक फोटो शेअर करत तो करत असलेल्या वेगळ्या कामाची माहिती दिली.
रहाणे (Ajinkya Rahane) म्हणतो, “मी सध्या माझ्यासाठी काही वेळ देत आहे. यात मी माझ्या विचारांवर काम करत आहे. मी काही लिखाण करतो व जुनी छायाचित्रही पहातो. यामुळे माझे मन शांत रहायला मदत होते.”
Everyday I take out some time for myself where I rest with my thoughts, type it out & go through old pictures. It really helps in keeping a peaceful mind.#Technology pic.twitter.com/nH0DVmIxdZ
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 10, 2020
रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असून तो यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळताना दिसणार होता. परंतु आता आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.