गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पहिल्या आयपीएल हंगामात आयपीएल चषक आपल्या नावे केला. २९ मे रोजी आयपीएल २०२२चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे संपन्न झाला. यावेळी गुजरातने राजस्थानच्या संघावर ७ विकेट्सने मात करत आयपीएलच्या १५व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. गुजरातसोबत यंदाच्या हंगामात नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जाएंट्स संघाने देखील सर्वांना प्रभावित केले. लखनऊ संघ अंतिम सामन्यात पोहोचला नसला तरी संघाचा फलंदाज एविन लुईस याने घेतलेला झेल आयपीएल २०२२मधील सर्वोत्कृष्ट झेल ठरला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात १८ मे रोजी खेळला गेलेला रोमांचक सामना जिंकण्यासाठी कोलकाताला शेवटच्या षटकात २१ धावा करायच्या होत्या. गोलंदाजीवर लखनऊचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस होता. अशा स्थितीत रिंकू सिंगने पहिल्या चार चेंडूंमध्ये ४, ६, ६, २च्या मदतीने १८ धावा केल्या. शेवटच्या २ चेंडूत केकेआरला विजयासाठी आणखी ३ धावांची गरज होती. अशा परिस्थितीत रिंकूने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूवर मिस शॉट खेळला.
रिंकू सिंगने मारलेल्या फटक्यानंतर डीप पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणारा एविन लुईस झेल घेण्यासाठी पुढे आला. त्याने डाव्या हाताच्या दिशेने डाईव्ह केले आणि एका हाताने चेंडू पकडला. यासह रिंकू सिंगची १५ चेंडूत ४० धावांची धडाकेबाज खेळी संपुष्टात आली. यादरम्यान रिंकूने २ चौकार आणि ४ षटकार मारले. फलंदाजीदरम्यान रिंकूचा स्ट्राईक रेट २६६.६६ होता. तो बाद होताच सामना फिरला आणि लखनऊचा संघ विजयी होऊन प्ले-ऑफसाठी पात्रल ठरला.
दरम्यान, १९८६च्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या डिएगो मॅराडोनाच्या ‘हँड्स ऑफ गॉड’च्या गोलने अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवले. त्याचप्रमाणे एविन लुईसच्या झेलने लखनऊ सुपर जायंट्सला विजय मिळवून दिला आणि लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचता आले. त्यामुळे आता लखनऊच्या चाहत्यांनी एविन लुईसला ‘हँड्स ऑफ गॉड’ म्हणून संबोधले तर वावगे ठरणार नाही.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत-ऑस्ट्रेलिया संघात वर्षभरातच रंगणार T20Iच्या दोन मालिका, जाणून घ्या सविस्तर
‘मिशन आयपीएल’ फत्ते केल्यानंतर आता हार्दिकचे आहे ‘हे’ लक्ष्य, देशासाठी करायचंय मोठ्ठ काम
अश्विन महान क्रिकेटर, पण गोलंदाजीत ‘या’ सुधारणेही आहे गरज; कुमार संगकाराचा कडवा सल्ला