---Advertisement---

क्रिकेटवरील प्रेम म्हणा वा संघनिष्ठा! तब्येत बरी नसतानाही लखनऊसाठी खेळला एविन लुईस, ठरला गेमचेंजर

On: गुरूवार, मे 19, 2022 8:00 PM
Evin-Lewis-Catch
---Advertisement---

आयपीएल २०२२चा हंगाम संपत आला आहे. साखळी फेरी सामने शेवटच्या टप्प्यात आले असून हळूहळू प्लेऑफचे चित्र स्पष्ट होत आहे. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली लढत झाली. या लढतीत चिवट झुंज दिल्यानंतर शेवटच्या चेंडूवर लखनऊने २ धावांनी कोलकातावर विजय मिळवा आणि प्लेऑफमध्ये धडक मारली. लखनऊच्या या विजयात एविन लुईस याचा मोठा वाटा राहिला. आता याच लुईसबद्दल संघाचा कर्णधार केएल राहुल याने मोठा खुलासा केला आहे. 

आपल्या एका झेलने सामन्याचा (Evin Lewis Catch) कायापालट करणाऱ्या लुईसची तब्येत (Evin Lewis Stomach Issue) या सामन्यादरम्यान बरी नव्हती. तरीही त्याने संघासाठी मैदानावर उतरण्याचे ठरवले आणि शानदार प्रदर्शनही केले.

लुईसच्या तब्येतीबाबत माहिती देताना राहुल म्हणाला की, “लुईस सामन्यादरम्यान पोटाच्या समस्येशी झगडत होता. अशा परिस्थितीत फलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली नाही. परंतु नंतर क्षेत्ररक्षणात त्याने ते करून दाखवले, ज्याची अपेक्षा सर्वांना त्याच्याकडून आहे.” 

दरम्यान लुईसने या सामन्यातील शेवटच्या षटकात कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याचा अतिशय महत्त्वपूर्ण असा झेल घेतला होता. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली असली, तर रिंकू सिंगने लखनऊसाठी हा सामना घाईला आणला होता. त्याने अवघ्या १५ चेंडूत ४० धावा केल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून देण्याच्या मानसिकतेसह खेळत होता. परंतु शेवटच्या षटकात एविन लुईसने त्याचा जबरदस्त झेल पकडला आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटवले.

शेवटच्या दोन चेंडूत केकेआरला तीन धावांची आवश्यकता होती. त्यावेळी स्ट्रईकवर रिंकू सिंग होता आणि मार्कस स्टॉईनिस गोलंदाजी करत होता. मैदानात तनावपूर्ण वातावरण होते आणि अशात रिंकूने षटकातील या पाचव्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. रिंकू तोपर्यंत खेळपट्टीवर जरी सेट झाला असला, तर दबावाच्या परिस्थितीत तो शॉट त्याला नीट मारता आला नाही आणि लुईसने संधी साधली. चेंडू हवेत असताना लुईस धावत आला आणि शेवटच्या क्षणी एका हातात हा झेल पकडला. रिंकू बाद झाल्यानंतर कोलकाताला उरलेल्या धावा करता आल्या नाहीत आणि त्यांनी हा सामना गमावला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!

केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!

खेळाडूमुळे नव्हे तर पंचांमुळे केकेआरने गमावली लखनऊविरुद्धची मॅच? रिंकू सिंगबाबत दिला चुकीचा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---