मुंबई । क्रिकेटचे नियम आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार आहेत. क्रिकेटमधील नियमांचे संरक्षक मानल्या जाणार्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अधिकृत वेबसाइटवर, हिंदीमध्ये सर्व नियम पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहेत. हे काम माजी पंच राजीव रिसोडकर यांनी केले आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये 19 वर्षे पंच म्हणून काम करणार्या मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) सदस्य रिसोडकर यांनी क्रिकेटच्या नियमशास्त्राचे हिंदीत भाषांतर केले आहे.
रिसोडकर यांनी 1997 ते 2016 पर्यंत स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम पाहिले. सध्या ते बीसीसीआयच्या पंच प्रशिक्षक पॅनेलमध्ये (स्तर३) आहेत.
एमसीसीची स्थापना 1787 मध्ये झाली. तेव्हापासून ही संघटना क्रिकेटचे नियम बनवते आणि बदलते. रिसोडकर यांनी एमसीसीच्या क्रिकेट कायद्याचे (2017 कोड द्वितीय आवृत्ती 2019) चे हिंदी भाषांतर केले आहे. हे एमसीसी वेबसाइटवर देखील उपलब्ध झाले आहे.
रिसोडकर म्हणाले की, “बीसीसीआयच्या प्रस्तावावरच मी क्रिकेटच्या नियमाचे पुस्तक हिंदीत भाषांतर केले, जेणेकरुन क्रिकेट चाहत्यांना खेळाबद्दल अधिक जाणून घेता येईल. नियम पुस्तकाचे हिंदी भाषांतर करण्यास त्यांना महिनाभराचा कालावधी लागला. याचा फायदा हिंदी भाषिक पंचांना होईल. आता त्यांना क्रिकेटचे नियम सहज समजून घेता येतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील ‘हा’ संघ घेऊन येत आहे डॉक्यूमेंटरी सिरिज; नाव आहे…
वीजेचे बिल पाहून हा क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, संपूर्ण मोहल्ल्याचे बिल पाठवले की काय…
२०० वर्षांपूर्वी पहिले द्विशतक ठोकणाऱ्या क्रिकेटरने साकारल्यात या भूमिका; ईस्ट इंडिया कंपनीची…
ट्रेंडिंग लेख-
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा
भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…