आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरवात होत आहे. पण त्याआधी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. 4 कोटी रुपये खर्चून दिल्ली कॅपिटल्समध्ये समाविष्ट झालेला इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक आयपीएलमधून बाहेर आहे. यानंतर आता माजी क्रिकेटपटूने इंग्लंडच्या खेळाडूंच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला असून आयपीएल फ्रँचायझींना लिलावात इंग्लिश खेळाडूंना स्वत:च्या जबाबदारीवर खरेदी करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
याबरोबरच आयपीएल 2024 पूर्वी आतापर्यंत इंग्लंडच्या चार खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. यामध्ये जेसन रॉय, मार्क वुड आणि गस ऍटकिन्सन यांचा समावेश आहे. तसेच आयपीएल लिलावात या खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावली जाते आणि नंतर अचानक हे खेळाडू आपली नावे मागे घेतात. त्यामुळे संघामध्ये चांगलेच वातावर तापत असते.
यामुळे IPL 2024 पूर्वी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने IPL फ्रँचायझींना इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेण्याबाबत इशारा दिला आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना आकाश चोप्राने म्हंटले आहे की, आयपीएल लिलावात इंग्लिश खेळाडूंना तुमच्या जबाबदारीवर खरेदी करा. यावर एका यूजरने कमेंट करत म्हटले आहे की, जर ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 10-12 कोटी रुपयांना विकत घेतले असते तर त्याने त्याचे नाव मागे घेतले असते का? असा देखील प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
Buy English players at the IPL Auction at your own peril 🫣🙄
— Aakash Chopra (@cricketaakash) March 13, 2024
2023 च्या हंगामात हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादनं 13.25 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र त्याला 21 पेक्षा कमी सरासरीनं फक्त 190 धावा करता आल्या. परिणामी, फ्रँचायझीनं त्याला मिनी लिलावापूर्वी सोडलं. यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 4 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तसेच ब्रूक नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातही नव्हता. त्यानं शेवटच्या क्षणी कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं होतं. ब्रूकनं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ECB) कुटुंबाला वेळ देण्याची मागणी करत आपलं नाव मागे घेतलं होतं.
दरम्यान, यापूर्वी, आयपीएल 2023 मध्ये देखील असेच काहीसे दिसले होते जेव्हा बेन स्टोक्स फक्त दोन सामने खेळून संपूर्ण हंगामातून बाहेर होता. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स बाहेर पडला आणि चेन्नई सुपर किंग्जने करोडो रुपये खर्च करून त्याला संघात सामिल करून घेतले होते.