---Advertisement---

2027 वर्ल्ड कपमध्ये रोहितचा समावेश न करणे योग्यच! दक्षिण आफ्रिकेचे मैदान यामागचे कारण

On: शनिवार, जुलै 18, 2026 6:43 PM
---Advertisement---

सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. रविवारी (19 जुलै) या मालिकेतील निर्णायक सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार असून त्याआधी एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे. भारतीय क्रिकेटचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या निवृत्तीच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या, ज्याला बीसीसीआयने चुकीचे ठरवले आहे.

बीसीसीआयने रोहितच्या निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम दिला असला तरी, त्याचे 2027 च्या विश्वचषकासाठी स्थान पक्के आहे की नाही, ही कुतूहलाची बाब आहे. जर या विश्वचषकासाठी त्याचा विचार केला जात असेल, तर तो निर्णय किती योग्य ठरेल?

2027 वर्ल्ड कपमध्ये रोहितचा समावेश न करणे योग्यच?
भारताने 2025 मध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, मात्र तरीही त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. मंडळाच्या या आश्चर्यकारक निर्णयावरून निवड समिती त्याच्या पलीकडे पाहत होती, असे स्पष्ट होते. त्यामुळे त्याला 2027 च्या विश्वचषकात आपले स्थान कायम ठेवण्याचे कठीण होते. आता त्याच्या खराब कामगिरीमुळे ते ही धोक्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत रोहितची कामगिरी कशी?
आयसीसी विश्वचषक 2027 चे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळले जाणार आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेमधील रोहितची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तेथे त्याने आतापर्यंत 14 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये 19.69 च्या सरासरीने आणि 68.44 च्या स्ट्राईक रेटने केवळ 256 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ एकच शतकी खेळी केली.

रोहितने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी खेळलेल्या सहा वनडे सामन्यामध्ये 170 धावा केल्या. त्याचवेळी ते एकमेव शतक झळकावले होते. तो एक सामना वगळता बाकींमध्ये त्याने निराशा केली. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या उसळी घेणाऱ्या असून त्याची कामगिरी भारतीय संघासाठी धोका ठरू शकते.

रोहितसाठी यशस्वी जायस्वालचे वादळ बनले धोकादायक
यशस्वी जायस्वाल सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. या प्रकारात आतापर्यंत त्याने सहा सामने खेळले असून 71.25 च्या प्रभावी सरासरीने 285 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतकेही केली आहेत.

नुकतेच यशस्वीने त्याच्या खेळलेल्या शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने नाबाद 110 धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे कदाचित निवडकर्ते त्याला शुबमन गिलसोबतचा नियमित सलामीवीर म्हणून घेण्याचा विचार करतील. त्याला संघात घेतले तर उजव्या-डाव्या हाताची सलामीची जोडी भारताला मिळेल, जी संघासाठी उत्तम बाब आहे. (Excluding Rohit Sharma from the 2027 World Cup is the right move! The South African venue is the reason behind this.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---