आयपीएल २०२२चा सोळावा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकत उभय संघ हंगामातील तिसरा विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असतील. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याने पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल याच्याकडून गुजरातविरुद्ध चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा केली आहे.
मयंकने (Mayank Agarwal) या हंगामातील पंजाबच्या पहिल्या सामन्यात चांगली खेळी केली होती. परंतु पुढील २ सामन्यात त्याची बॅट शांत दिसली आहे. अशात गुजरातविरुद्ध त्याच्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) अडथळा ठरू शकतो. परंतु चोप्राचे असे म्हणणे आहे की, हे दोन्ही खेळाडू यापूर्वी एकाच संघाकडून खेळल्यामुळे मयंकला जास्त समस्या उद्भवणार नाहीत.
आपल्या यूट्यूब चॅनलवर पंजाब विरुद्ध गुजरात (GT vs PBKS) सामन्याचा प्रीव्हू करताना चोप्रा (Chopra On Mayank’s Knock) म्हणाला की, “मयंकने जास्त धावा केलेल्या नाहीत. तो एका सामन्यात उमेश यादवद्वारे आणि दुसऱ्या सामन्यात मयंक अगरवालद्वारे बाद झाला होता. त्याची आतापर्यंतची फक्त एकच खेळी चांगली राहिलीय. परंतु आता त्याने संघासाठी मोठ्या धावा करण्याची वेळ आलीय. त्याने शमीसोबत एकाच संघाकडून दीर्घ काळासाठी खेळले आहे. त्यामुळे मला अपेक्षा की, मयंक गुजरातविरुद्ध चांगल्या धावा करेल. ”
शिखर धवनकडूनही चोप्राला आहेत अपेक्षा
मयंकचा सलामी जोडीदार शिखर धवन हादेखील चमकदार प्रदर्शन करू शकतो. गुजरातच्या गोलंदाजी विभागात सहभागी गोलंदाजांविरुद्ध धवनचे आकडे चांगले आहेत. त्यामुळे या दिग्गज समालोचकाने धवनकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा केली आहे. चोप्रा म्हणाला की, जर तुम्ही गुजरातच्या सर्व गोलंदाजांविरुद्ध धवनचे आकडे पाहिले तर, त्याचे आकडे अतिशय चांगले आहेत. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. परंतु त्याला मोठ्या खेळी करता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल.
https://youtu.be/J2n1Te9aPns
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्ज
जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिविंगस्टोन, मयंक अगरवाल (कर्णधार), शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), कागिसो रबाडा, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्स
मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, डेविड मिलर, राशीद खान, अभिनव मनोहर, वरुण आरोन, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आतापर्यंतचे ९ धक्कादायक निकाल, वाचा एका क्लिकवर
अर्धशतक करताना अचानक पृथ्वी शॉला काय झाले? मैदानावर बसून असं काही करू लागला; वाचा सविस्तर
Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित