कोणत्याही क्रिडापटूला आपण खेळत असलेल्या खेळाव्यतिरिक्त एखादा इतर खेळही आवडत असतो. एमएस धोनी, विराट कोहली, सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अशा बऱ्याचशा क्रिकेटपटूंना रिकाम्या वेळेत इतर खेळात आपला हात आजमावताना बऱ्याचदा पाहिले गेले आहे. यातीलच ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर यालाही क्रिकेट वगळता फॉम्यूला वन (F1 World Title) कार रेस पाहायला खूप आवडते.
रविवारी (१२ डिसेंबर) फॉर्म्यूला वनच्या इतिहासातील सर्वात रोमांचक शर्यतींपैकी एक शर्यत पार पडली आहे. या शर्यतीत स्टार कार ड्राइव्हर लुएस हॅमिल्टन याला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. त्याच्या या पराभवाने सचिन खूप दु:खी आहे. त्याने सोशल मीडियावर ट्वीट पोस्ट करत त्याच्या पराभवावर निराशा व्यक्त केली आहे.
त्याचे झाले असे की, फॉर्म्यूला वनच्या या धाकधूक वाढवणाऱ्या शर्यतीत अकेर रेडबुलच्या मॅक्स वेरस्टाप्पेनने पहिल्यांदाच विजय मिळवला. त्याने लुइस हॅमिल्टनला शेवटच्या लॅपमध्ये पछाडत अबु धाबी ग्रँड प्रिक्स (Abu Dhabi Grand Prix)मध्ये बाजी मारली. यासह तो विश्व चँपियन बनणारा पहिलाच डच ड्राइव्हर बनला आहे.
ही शर्यत जिंकत हॅमिल्टनला ७ वेळा जेतेपद जिंकणाऱ्या माइकल शूमाकरचा विक्रम मोडण्याची संधी होती. हॅमिल्टन ( lewis hamilton) आणि वेरस्टाप्पेनने (max verstappen) शेवटच्या लॅपमध्ये सोबतच शर्यतीची सुरुवात केली होती. परंतु वेरस्टाप्पेनने पहिल्या ४ टप्प्यातच त्याला पछाडले. वेरस्टाप्पेनच्या विजयासह रेडबुलनेही २०१३ नंतर पहिल्यांदाच फॉर्म्यूला वनचे विजेतेपद जिंकले आहे.
What a race!
Congrats to Max for becoming the World Champion for the 1st time & there will be many more.
However, my heart goes out to Lewis. What a season he’s had too. If not for the safety car, the trophy would’ve been his. Sheer bad luck. All the best for the next season. pic.twitter.com/pYPLoin4gO
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 12, 2021
वेरस्टाप्पेनच्या या यशावर आणि हॅमिल्टनच्या पराभवावर बोलताना सचिनने लिहिले की, “ही एक शानदार शर्यत होती. पहिल्यांदाच विश्व चँपियन बनणाऱ्या वेरस्टाप्पेनचे अभिनंदन. तू पुढेही असेच मिळवत राहशील. पण हैमिल्टनचे मला जरा वाईट वाटले. त्याच्यासाठी यंदाचा हंगाम शानदार राहिला आहे. जर सेफ्टी कार नसती, तर फॉर्म्यूला वनची ट्रॉफी त्याचीच होती. असो, त्याचे दुर्भाग्यच. पुढील हंगामासाठी तुला खूप शुभेच्छा.”
1 ball 6 required and guess what, Max Verstappen hits it. Unbelievable win #AbuDhabiGP #F1TitleChampionship
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2021
फक्त सचिनच नव्हे तर भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही या शर्यतीवर प्रतिक्रिया दिली आहे. एका चेंडूवर ६ धावा पाहिजेत. मॅक्स वेरस्टाप्पेनने या चेंडूवर फटका मारून दाखवला. अविश्वसनीय विजय, असे त्याने लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
द. आफ्रिका दौरा: ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर इन, तर १७ शतके झळकावणारा फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर
शेन वॉर्नने निवडले सध्याचे कसोटीतील ५ उत्कृष्ट फलंदाज, ‘या’ भारतीयाला दिले स्थान
“लोकं काय बोलतात यावर माझं लक्ष नाही”, वनडे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रीया