कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० ला काल(१८ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ३ वेळचा विजेता त्रिनबगो नाईट रायडर्स व गतवेळचा विजेता बार्बाडोस ट्रायडेंट्सने अनुक्रमे गयाना अमेझॉन वॉरियर्सचा व सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियॉट्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. बार्बाडोसच्या विजयात महत्त्वाची भुमिका राहिली तो अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानची.
सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियॉट्स विरुद्धच्या सामन्यांत बार्बाडोसची अवस्था १५ चेंडूत ३ बाद ८ झाली होती. पण नंतर जेसन होल्डर (३८) व मेयर्स (३७) ने डाव सावरला. यांच्यासोबतच सॅंटनर (२०) व राशिद खान (नाबाद २६) संघाला १५३ धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भुमिका निभावली होती.
राशिदने २० चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी केली. त्यात एक षटकार व २ चौकारांचा समावेश होता. त्याने मारलेला हा एकमेव षटकार अफलातून होता. हा षटकार त्याने फलंदाजीस आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मारला होता. याच षटकाराचा व्हिडीयो आयसीसीने शेयर केला आहे. त्याने अल्झारी जोसेफने टाकलेल्या १५ व्या षटकातील चेंडूवर राशिदने वेगळ्याच प्रकारे फ्लिकचा फटका खेळला आणि चेंडू थेड सीमा पार करुन गेला.
WHAT A SHOT 💥
Barbados Tridents' Rashid Khan hit this ⚡️ six off the first ball he faced in #CPL20.pic.twitter.com/ykGCSlmCK2
— ICC (@ICC) August 19, 2020
हा सामना बार्बाडोस संघाने ६ धावांनी जिंकला. या विजयात राशिद खान (२६ धावा व २७ धावांत २ बळी) आणि मिशेल सॅंटनर (२० धावा व १८ धावांत २ बळी) चा मोठा वाटा होता.