३ ऑग, १९८४ रोजी एका मुलाचा जन्म फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या कुटुंबात झाला जो पुढे जाऊन भारतीय फुटबॉलचा नवा चेहरा बनणार होता. भारत सामने तर जिंकत होता पण ज्याच्या येण्याने भारतीय संघ ट्रॉफी जिंकू लागला. हो आम्ही बोलतोय सुनील छेत्री विषयी. ज्याची तुलना सरळ सरळ या काळातील महान खेळाडू लियोनेल मेस्सीशी करायला भारतीय फुटबॉल चाहते घाबरत नाहीत. सुनील छेत्री एक आर्मी कुटुंबातील आहे हे सर्व जण जाणतात पण हे खूप थोड्या क्रीडाप्रेमींना माहिती असेंल की सुनील छेत्रीचे वडील स्वतः आर्मीच्या टीम मध्ये खेळायचे इतकेच नाही तर त्याची आई व जुळी बहीण दोघीही नेपाळच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी खेळल्या आहेत.
अनेक रेकॉर्ड्स सुनील छेत्रीच्या नावावर जमा झाले आहेत. पण राष्ट्रीय संघासाठी खेळताना जो बहर त्याचा खेळाला येतो तो काही जादुई आहे. ९३ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना त्याने ५३ गोल केले आहेत. छेत्री २०११ पासून भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने आपल्या खेळाची सुरुवात मोहन बगान संघाकडून कडून केली जेव्हा तो १८ वर्षाचा पण नव्हता .
भारतीय संघाला २००७, २००९, २०१२ मध्ये नेहरू कप तर २०११ मध्ये साफ चॅम्पियन्सशिप जिंकून देण्यात महत्वाचा भाग होता. त्या अगोदर भारतीय संघाने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नव्हती. २०११ मध्ये AFC आशियाई कप फायनल मध्ये २ गोल करून तो कप जिंकून दिला.
महम्मद सलीम व बायचुंग भुतिया यांच्या नंतर आंतरराष्ट्रीय लीग कडून खेळणारा तो ३ रा खेळाडू ठरला. अनेक लीग्ज मधून खेळण्याच्या ऑफर्स त्याला मिळत होत्या. सपोर्टींग क्लब पोर्तुगाल व सेल्टिक खूप जवळ होते करार करण्याच्या पण बाजी मारली कॅन्सस सिटी विझार्ड ने. पण तो काळ काही ठीक नसल्याने शेवटी तो क्लब सोडून मायदेशी परतला.
जेव्हा इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली तेव्हा दुसऱ्या मोसमामध्ये मुंबई सिटी एफसीने सर्वाधीक बोली लावत १.२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. तो सर्वाधिक बोली लावेला भारतीय फुटबॉलपटू ठरला. त्याने आयएसएलमध्ये आपली छाप पडत हॅट्ट्रिक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला.
सुनील छेत्रीला २००७, २०११, २०१३, २०१४ ला AIFF प्लेयर ऑफ द इयरचा हा किताब ४ वेळा पटकावला. हा किताब चारवेळा पटकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. आशा करू की त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर करावेत व भारतीय संघाला यशाच्या शिखरावर घेऊन जावे.