भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी धोनीला ट्रिब्यूट दिला आहे. खरं तर अनेक मीडिया वेबसाईट्सने बुधवारी (२८ ऑक्टोबर) बातमी दिली होती की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बीसीसीआने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर धोनीचा फोटो लावला आहे. परंतु आता सत्य समोर आले आहे.
काय आहे सत्यता?
बीसीसीआयचे ट्विटर अकाउंटवर कव्हर फोटोमध्ये धोनीचा फोटो असल्याचं खरं आहे. परंतु खरं तर धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. याच्या दुसऱ्या दिवशी बीसीसीआयने धोनीचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर कव्हर फोटोमध्ये लावला होता.
यावरून स्पष्ट होते की, धोनीने निवृत्ती घेतल्यामुळे बीसीसीआयने त्याला ट्रिब्यूट देण्यासाठी हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कव्हर फोटोमध्ये लावला होता.
#NewCoverPic #ThankYouMSDhoni pic.twitter.com/eXcV1NMeMQ
— BCCI (@BCCI) August 16, 2020
त्यामुळे बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी २८ ऑक्टोबरला कव्हर फोटोमध्ये धोनीचा फोटो लावल्याचा मीडिया वेबसाईट्सने केलेला हा दावा खोटा ठरला आहे.
https://www.instagram.com/tv/CD6ZQn1lGBi/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वेळापत्रक जारी केले आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी साामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. यातील पहिला कसोटी सामना ऍडलेडमध्ये दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. हा कसोटी सामना १७ ते २१ डिसेंबरदरम्यान खेळला जाणार आहे.
आयपीएलमध्ये करतोय चेन्नईचे नेतृत्व
आयपीएल २०२०मध्ये एमएस धोनी युएईत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसत आहे. त्याचा संघ यावर्षी संघर्ष करताना दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत या हंगामात १३ सामने खेळले आहेत. त्यात त्यांना केवळ ५ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ८ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-“भारताच्या ‘या’ राज्यात बनेल एमएस धोनीचे मंदीर,” माजी क्रिकेटरचे मोठे विधान
-धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचा फॉर्मुला सापडला, श्रीलंकन दिग्गजाने सुचवला मोठा उपाय
-‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
-सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
-…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला