आज भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी२० विश्वचषकाचा पहिला अंतिम सामना खेळत आहे. आत्तापर्यंत भारतीय गोलंदाजांनी या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. यात मुंबईकर क्रिकेटर जेमीमा रोड्रीग्जचाही मोलाचा वाटा राहिला आहे.
याच जेमीमा रोड्रीग्जबद्दल काही मनोरंजक गोष्टी-
-जेमीमाचा जन्म ५ सप्टेंबर २००० रोजी मुंबई येथे झाला असून ती १९ वर्षांची आहे.
-ती ४ वर्षांची असताना तिने लेदर बाॅलवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
-तिचे वडिल एवान रोड्रीग्ज हेच तिचे पहिले कोच राहिले आहेत.
-लहान असताना ती आपले भाऊ एनाॅच आणि अँडी यांना गोलंदाजी करत असे.
-वयाच्या १२व्या वर्षी तीने १९वर्षाखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-तिने शालेय शिक्षण सेंट जोफेसमध्ये घेतले असून महाविद्यालयीन शिक्षण रिझवी काॅलेजमध्ये घेत आहे.
-परिक्षेआधी केवळ एक आठवडा अभ्यास करुनही तीने १०वीच्या परिक्षेत ८० टक्के गुण मिळवले होते.
-प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला क्रिकेटर आहे.
-ती फावल्यावेळेत गिटार वादन व गायन करते.






