मंगळवारी (09 मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आरसीबीच्या फलंदाजांना धावांचा पाऊस पाडला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलर आणि यजमान मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना होता. नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर फाफ डू फ्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात मोठी भागीदारी पार पाडली. मॅक्सवेलने केलेल्या अर्धशतक 8 चौकार आणि 4 षटकार होते.
आरसीबीसाठी सलामीला आलेला कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि चौथ्या क्रमांकावरील ग्लेन मॅक्सवेल () यांनी 62 चेंडूत 120 धावांची भागीदारी पार पाडली. यात मॅक्सवेलचे यगोदान 33 चेंडूत 68 धावांचे होते. दुसरीकडे फाफ डू प्लेसिस () याने 41 चेंडूत 158.53च्या स्ट्राईक रेटने 64 धावा केल्या. आरसीबीची धावसंख्या 136 असताना मॅक्सवेलच्या रूपात आरसीबीला तिसरी विकेट गमवावी लागली. मॅक्सवेलने या धावा 206.06च्या स्ट्राईक रेटने केल्या. डू प्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्यातील भागीदारीमुळे पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात गमावून देखील आरसीबीला वेगवान सुरुवात मिळाली. पहिल्या 10 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 2 बाद 104 धावा होती. (Faf du Pleis and Glenn Maxwell’s explosive innings got RCB off to a fast start.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या 16 वर्षांखालील खेळाडूंना मिळाले रिषभ पंतचे मार्गदर्शन, एनसीएत झाली भेट
सनी लिओनीने व्यक्त केले धोनीविषयी आपले प्रेम! आयपीएलमधील ‘या’ संघाची आहे फॅन






