इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी (२१ एप्रिल) दोन सामने खेळवले गेले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमनेसामने आले. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात २२० धावा धावफलकावर लावल्या. या सामन्यात सीएसकेचा अनुभवी सलामीवीर फाफ डू प्लेसिसने टी२० कारकिर्दीत मैलाचा दगड पार केला.
प्लेसिसची उल्लेखनीय कामगिरी
सीएसकेचा अनुभवी सलामीवीर फाफ डू प्लेसीस आज आपल्या टी२० कारकिर्दीतील २४३ वा सामना खेळत होता. या सामन्यापूर्वी त्याच्या नावे ५९९९ धावा जमा होत्या. या सामन्यात पहिली धाव काढताच डू प्लेसिस टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करणारा ४५ वा फलंदाज बनला. हा सामना संस्मरणीय बनवत डू प्लेसिसने अप्रतिम अर्धशतक झळकावले. डू प्लेसिसने या सामन्यात ६० चेंडूत नाबाद ९५ धावा बनविल्या.
टी२०मध्ये ६००० धावा करणारा ६ वा खेळाडू
टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करणार डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा ६ वा फलंदाज आहे. त्याच्यापूर्वी एबी डिविलियर्स (९२३६), डेव्हिड मिलर (७२३८), कॉलिन इंग्राम (६९४२), जेपी ड्यूमिनी (६३९७) आणि क्विंटन डी कॉक (६१३४) या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टी२० क्रिकेटमध्ये ६००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
या संघांचे केले आहे प्रतिनिधित्व
प्लेसीसने २००७ पासून टी२० क्रिकेट खेळणाऱ्या डू प्लेसिसने आत्तापर्यंत १४ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणाऱ्या प्लेसिसने दक्षिण आफ्रिका अ, टायटन्स, पर्ल रॉक व नॉदर्न या दक्षिण आफ्रिकेतील संघांसाठीदेखील सामने खेळले आहेत.
डू प्लेसिस जगभरात व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळत असतो. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट, सीपीएलमध्ये सेंट किट्स आणि नेविस, इंग्लंडमध्ये केंट व लँकेशायर, पीएसएलमध्ये पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स तर, बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनिगेड्स या संघांसाठी तो खेळला आहे.
त्याने टी२० कारकिर्दीत आत्तापर्यंत २४३ सामन्यांत ६०९४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
डायव्हिंग डेव्हिड! वॉर्नरने पकडलेला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
एमएस धोनी, रोहित शर्माच्या पंक्तीत आता दिनेश कार्तिकनेही मिळवले स्थान; केला ‘हा’ कारनामा
एकाच मोसमात तिन प्रकारे शुन्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज बनला पूरन, ‘हा’ दिग्गज ठरलेला पहिला मानकरी