सनरायझर्स हैदराबाद संघाला आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या सामन्यात हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात आरसीबीसाठी विराट कोहली याने शानदार शतक झळकावले. त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. मात्र, दुसऱ्या बाजूने आरसीबीचा कर्णधार व सलामीवीर फाफ डू प्लेसिस याने देखील आपल्या कामगिरीत सातत्य राखत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मिळालेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली याने 63 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तसेच, प्लेसिस यानेही 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. त्यांच्यात यादरम्यान पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हा सामना आरसीबीने 4 चेंडू शिल्लक ठेवत आणि 187 धावा पूर्ण करत 8 विकेट्सने खिशात घातला.
मागील वर्षी आरसीबीचा भाग झालेला व नेतृत्व करत असलेला प्लेसिस या संपूर्ण हंगामात आरसीबीच्या फलंदाजीची धुरा वाहताना दिसतोय. त्याने 13 सामने खेळताना 13 डावांमध्ये 58.50 अशा असामान्य सरासरीने 702 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 153.94 इतका दमदार दिसून आला. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत हंगामात 8 अर्धशतके आलीत. तसेच त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूला देण्यात येणाऱ्या ऑरेंज कॅपवर आपला हक्क सांगितला आहे.
आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या आरसीबीला या वर्षी प्ले ऑफमध्ये जाण्याची चांगली संधी चालून आली आहे. गुजरात विरुद्धचा अखेरचा सामना जिंकल्यास ते प्ले ऑफसाठी पात्र होतील. तसेच चेन्नई व लखनऊ यांनी आपले सामने गमावल्यास दुसऱ्या क्रमांकावर जाऊन क्वालिफायर सामना खेळण्याची संधी देखील त्यांना मिळू शकते.
(Faf Du Plessis Great Consistency For RCB In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! विराटने शतक ठोकताच पत्नी अनुष्काने लावला व्हिडिओ कॉल, अभिनेत्रीकडून पतीवर प्रेमाचा वर्षाव
‘कुणीतरी विराटच्या शतकाने…’, प्रसिद्ध पत्रकाराने गंभीरवर पुन्हा साधला निशाणा, लगेच वाचा