भारत-ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. या मालिकेत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर तो आपल्या फॉर्मशी झगडत राहिला. यानंतर विराटच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा होत आहेत. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) विराट कोहलीच्या फॉर्म आणि निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) म्हणाला की, “संघर्षानंतर विराट कोहली आणखी मजबूत पुनरागमन करेल. निवृत्ती हा अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. एक खेळाडू म्हणून त्याचा खेळाचा काळ कधी संपेल हे कोणीही सांगू शकत नाही. मला समजते की, विराट कोहलीसारखा खेळाडू खूप प्रेरित असतो. तो या अगोदर या टप्प्यातून गेला आहे, त्यामुळे त्याला काय करायचे आहे हे त्याला माहीत आहे. एक वेळ आली होती जेव्हा असे वाटत होते की, कसोटी क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीचा काळ संपला आहे, परंतु त्याने शानदार शैलीत पुनरागमन केले होते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूसाठी हे वेगळे असते. प्रत्येक खेळाडूला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. मला आठवते की ती वेळ माझ्यासाठी होती. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीकोनातून मला हे नक्कीच माहित आहे. माझ्यात पूर्वीसारखी भूक आणि उत्साह नव्हता. मला असे वाटले की, नवीन खेळाडूंनी टी20च्या जगात येण्याची आणि पाऊल ठेवण्याची ही नक्कीच योग्य वेळ आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर होतो असे वाटत असतानाही मला हे करायचे होते.”
विराट कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी कसोटीत 2011 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 210 डावात फलंदाजी करताना 46.85च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके देखील झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलंदाजी तर सोडाच, फलंदाजीतही धुमाकूळ घालतोय भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू
नाथन स्मिथ बनला ‘सुपरमॅन’ हवेत उडत घेतला अविश्वसनीय झेल! पाहा VIDEO
आजच्याचदिवशी रोहित शर्मा बनला होता मुंबई इंडियन्सचा हिस्सा, फ्रँचायझीने शेअर केला 14 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास! VIDEO