पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकतो. याविषयी स्वतः डू प्लेसिसने संकेत दिले आहेत. 39 वर्षीय अनुभवी फलंदाज मागच्या मोठ्या काळापासून संघ व्यवस्थापनासोबत याविषयी चर्चा देखील करत आहे.
फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) 2021 नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. पण 2024 टी-20 विश्वचषकात तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळताना दिसू शकतो. विश्वचषकापूर्वीच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची संधी दिली जाऊ शकते. दरम्यानच्या काळात त्याने आरसीबीसाठी कर्णधार म्हणून भूमिका पार पाडली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डू प्लेसिस म्हणाला, “मला विश्वास आहे की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. आम्ही मागच्या काही वर्षांपासून याविषयी चर्चा करत आहोत. पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक होणार आहे, त्याचा विचार करूनच संतुलन पुढे चाललो आहे. नवीन प्रशिक्षकांसोबत मी पुनरागमनाविषयी चर्चा केली आहे.”
डुप्लेसने पुढे असेही सांगितले की, पुनरगमनासाठी तो मेहनत घेत आहे आणि फिटनेसवर काम करत आहे. “मी फिटनेसवर काम करत आहे कारण, संघासाठी चांगले प्रदर्शन करायचे आहे. जेव्हा तुमचे वय जास्त होते, तेव्हा शरीरावर देखील जास्त काम करावे लागते. वाढत्या वयामुळे हॅमस्ट्रिंग आणि शरीराचे इतर भाग तितक्या चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत. अशात व्यायाम करावाच लागतो.”
दरम्यान, फाफ डू प्लेलिस याने 2021 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. टी-20 आंतरराष्ट्रीय आणि वनडे क्रिकेटमधून डू प्लेसिस अद्याप निवृत्त झाला नाहीये. पण या दोन्ही फॉरमॅटमध्ये मोठ्या काळापासून त्याला संधी मिळाली नाहीये. आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना डू प्लेसिसने जुलै 2019, तर शेवटचा वनडे सामना डिसेंबर 2020 मध्ये खेळला होता. पण 39 वर्षीय दिग्गज पुढच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकासाठी तयारी करत आहे. (Faf du Plessis hints at a comeback in international cricket)
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सॅमसनचे जबरदस्त शतक! रेलवेविरुद्ध एवढे षटकार मारले, पण…
अनुभव नसणारे ‘हे’ 2 खेळाडू रोहितनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाचे प्रबळ दावेदार, दिग्गजाने सांगितली नावे