---Advertisement---

जोबर्ग सुपर किंग्सने जाहीर केला नवा कर्णधार! 27 वर्षीय दक्षिण आफ्रिकी खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

On: मंगळवार, जानेवारी 13, 2026 7:24 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगच्या (SA20) दरम्यान जोबर्ग सुपर किंग्सने (JSK) आपला कर्णधार बदलला आहे. संघाचा नियमित कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du plessis) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे चाहते चिंतेत होते की आता संघाचे नेतृत्व कोण करणार? मात्र, जोबर्ग सुपर किंग्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नवीन कर्णधाराची अधिकृत घोषणा केली आहे.

जोबर्ग सुपर किंग्सने इंस्टाग्रामवर माहिती दिली की, उर्वरित हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज अष्टपैलू डोनोवन फरेरा ( Donovan farera) संघाचा कर्णधार असेल. 27 वर्षांचा हा खेळाडू सध्या जेएसकेसाठी ‘फिनिशर’ म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या हंगामात त्याचा स्ट्राईक रेट 184.00 चा राहिला आहे. आता फाफ डु प्लेसिसच्या अनुपस्थितीत तो संघाला कशी दिशा देतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एमआय केपटाऊन (MI Cape Town) विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना फाफ डु प्लेसिसच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो फलंदाजीलाही येऊ शकला नव्हता. तपासणीनंतर स्पष्ट झाले की, त्याच्या अंगठ्याचे लिगामेंट फाटले (Ligament Tear) असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याच कारणामुळे तो या हंगामात पुढे खेळू शकणार नाही.

फाफ डु प्लेसिसच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, याचीही घोषणा करण्यात आली आहे. जेएसकेसाठी यापूर्वी चांगली कामगिरी केलेला ल्यूस डु प्लॉय पुन्हा संघात परतला आहे. या डावखुऱ्या फलंदाजाचा SA20 मधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने जेएसकेसाठी 28 सामन्यात 743 धावा केल्या आहेत.

जेएसकेसाठी हा हंगाम आतापर्यंत चांगला राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---