fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अखेर फाफ डुप्लेसीने केला धोनीच्या सीएकेच्या ड्रेसिंगरुममधील ‘त्या’ वातावरणाचा खुलासा

मुंबई । एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. तसेच सीएसकेचा संघ आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सर्वच प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा संघ आहे. सीएसकेने हे यश कसे मिळवले?हा क्रिकेट फॅन्समध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्न आहे.

क्रिकेट फॅन्सच्या या प्रश्नाचे उत्तर संघातील खेळाडू फॉफ डुप्लेसिस याने दिले आहे. डुप्लेसिसच्या मते, “ड्रेसिंग रुममधील वातावरण हे संघाच्या यशाचे गमक आहे. तसेच या संघात एमएस धोनीसारखे समजदार क्रिकेटपटू आहेत.”

फॉफ डुप्लेसिसने झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटर पॉमी एमबांग्वा याच्यासोबत इंस्टाग्राम चॅटमध्ये बोलताना म्हणाला की, “चेन्नई संघाच्या ड्रेसिंग रूम खूपच शांत असते. तेथे खूपच समजदार क्रिकेटपटू आहेत. सीएसकेच्या प्रत्येक खेळाडूला असे वाटते की कोणता तरी खेळाडू चांगली खेळी करून मॅच जिंकून देईल. प्रत्येक वेळी वेगवेगळे खेळाडू जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतात. या संघाचे सर्व निर्णय धोनीच घेतो.”

सीएसकेच्या संघाने दोन वेळा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी देखील जिंकली आहे. आयपीएलची ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकण्यात मुंबईचा संघ पुढे आहे. मागील वर्षी सीएसकेच्या संघाला हरवून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर मोहोर लावली.

डु प्लेसीस पूर्वी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने देखील धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

You might also like