प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळावी आणि मिळालेल्या संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत दमदार कामगिरी करावी. जेणेकरुन पुढे अनेक वर्षे तो खेळाडू संघात टिकून राहिल. पण, विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल हा त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक ठोकले तरीही त्यांना संघातून बाहेर करण्यात आले. Faiz Fazal Said I Hit Half Century On ODI Debut Still I Don’t Find Place In Indian Team
फजलने १५ जून २०१६ला हरारे येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी त्याने ६१ चेंडूत नाबाद ५५ धावा करत दमदार सुरुवात केली होती. पण, फजलचा पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा सामना ठरला.
स्पोर्ट्स टायगरच्या यूट्यूब शो ‘ऑफ द फिल्ड’मध्ये बोलताना फजलला प्रश्न विचारण्यात आला की, तूला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली नाही. तुझ्यामते कुठे तुझी चुकी झाली? याचे उत्तर देत फजल म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मलाही माहित नाही मला संधी न देण्यामागे काय कारण आहे. वनडे पदार्पणाच्या सामन्यात मी अर्धशतक केले. तरी मला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले नाही.”
“आपणा सर्वांना माहिती आहे की, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खूप स्पर्धा आहे. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की, मला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. कारण, माझे लक्ष्य माझ्या देशाकडून खेळायचे होते आणि त्याची तुलना दूसऱ्या कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. मला आताही भारतीय कसोटी संघाकडून खेळायचे आहे. पण, मी भारतीय संघात कायम राहू शकलो नाही, याचे मला दुख: आहे. पण, या गोष्टीची माझ्याशी चौकशी करण्याऐवजी यासोबत जुळलेल्या इतर लोकांशी विचारायला पाहिजे,” असे पुढे बोलताना फजल म्हणाला.
तसेच स्वत:मधील उणीवांविषयी बोलताना फजल म्हणाला की, “मला क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर खेळायला आवडते. माझ्यामध्ये अजून काही कमतरता आहेत, ज्यांना मला सुधारावे लागेल. मला अजून जास्त चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे. क्रिकेट माझ्यासाठी सर्वात मोठे मोटिवेशन आहे. त्यामुळे मी ऑफ सीजनमध्ये इंग्लंडला जाऊन प्रीमियर लीग खेळतो. मी आता आयपीएलचाही भाग नाही. त्यामुळे मी माझा वेळ घरी बसून वाया घालवत नाही.”
३४ वर्षीय फैज फजलचा जन्म नागपुर येथे झाला असून तो एक अतिशय़ प्रतिभावान क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. रणजी विजेत्या विदर्भ संघाचा तो कर्णधार होता.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेचे टेंशन वाढले, सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर राहणार ‘हे’ धाकड खेळाडू
सीएसके आणि केकेआर संघ १० अतिरिक्त नेट गोलंदाजांना घेऊन जाणार यूएईला, तर दिल्ली संघ…
केवळ धोनीने सांगितल्यामुळे ‘या’ क्रिकेटरने खेळला होता २०११ सालचा विश्वचषक
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी