फैज फझल (Faiz Fazal) हा भारतीय क्रिकेटमधील अशा खेळाडूंपैकी एक आहेत जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत चमक दाखवतो. विदर्भाकडून खेळणाऱ्या या खेळाडूची गणना देशातील सर्वात सक्षम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. फैज फजलला भारतीय संघात खेळण्याची फार कमी संधी मिळाली. मात्र, तरीही भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याचे त्याचे स्वप्न आहे. ३६ वर्षीय खेळाडूने गेल्या दोन रणजी हंगामात १९ सामन्यांत ४६.९६ च्या सरासरीने १२६८ धावा केल्या आहेत. तो पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे . मात्र, तो म्हणतो की ओमिक्रॉनमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यापासून जानेवारीपासून त्याने बॅटला हातही लावला नाही. अशा स्थितीत तयारीवर परिणाम झाला आहे.
फैज फझलने एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, त्यांचा संघ रणजी ट्रॉफीसाठी खूप मेहनत घेत आहे. मात्र, ४ जानेवारीला ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे कळताच त्याने बॅटला हातही लावला नाही. सगळेच गोंधळलेले आहेत. तो म्हणाला, “माझे अनेक सहकारी आणि इतर संघातील खेळाडू विचारत होते की आपण क्रिकेट खेळू शकू का? आम्ही खेळताना चेंडू सोडयचा की षटकार मारायचा? आम्ही तयारी कशी करायची? खरे सांगायचे तर माझ्याकडे उत्तर नव्हते. आता जरी बीसीसीआयने प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायचे ठरवले आहे तरीही ते कठीण आहे. कारण, अनेकांनी तीन आठवडे बॅट किंवा चेंडूला स्पर्शही केलेला नाही.”
फैज फजल पुढे म्हणाला,
“वैयक्तिक पातळीवर सध्याची परिस्थिती अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. होय, मी समजू शकतो की बीसीसीआय सर्वोत्तम कामगिरी करत आहे. परंतु, आमच्या खेळाडूंसाठी हे एक वर्ष अभ्यास करण्यासारखे होते. ज्यामध्ये कोणतीही परीक्षा नव्हती. तरुणांचा वेळ निघून जात आहे आणि आमच्यासारखे जेष्ठ खेळाडू ज्यांना नोकऱ्या नाहीत ते अस्वस्थ होत आहेत. आमच्याकडे उत्पन्नाचा हा एकमेव स्त्रोत आहे. आम्ही पाच-सहा महिने क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत घेतली. हे ९ ते ५ वाजेपर्यंतचे काम नाही. हा क्षमतेचा खेळ आहे आणि आपण आपली क्षमता दाखवू शकत नाही. ही सर्वात निराशाजनक गोष्ट आहे.”
फैज फजलने २०१६ मध्ये भारताकडून एकदिवसीय सामना खेळला होता. यामध्ये त्याने नाबाद ५५ धावा केल्या. त्यानंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. मात्र, तरीही तो भारताकडून कसोटी खेळण्याची आकांक्षा बाळगतो. कसोटी क्रिकेट खेळण्याच्या इच्छेने तो खेळाशी जोडला गेल्याचे तो म्हणतो. वयाच्या ३६ व्या वर्षीही तो स्वत:ला खूप फिट समजतो.
महत्वाच्या बातम्या-
रोहित-द्रविड जोडीवर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, ‘ते दोघे भारताला…’ (mahasports.in)
‘सचिन तेंडुलकरची मला दया येते’, शोएब अख्तर असं नक्की का म्हणाला? वाचा सविस्तर (mahasports.in)
सीएसकेची शेअर बाजारातही सत्ता! गुंतवणूकदारांची झाली चांदीच-चांदी (mahasports.in)