---Advertisement---

पाकिस्तानी सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी, 18 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 4:45 PM
---Advertisement---

बुलावायो | पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात शुक्रवार (20जुलै) क्विन्स स्पोर्ट्स क्लब बुलावायो येथे पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानच्या फखर जमान आणि इमाम उल हक या सलामीवीरांनी विश्वविक्रम केला आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीसाठी 304 धावांची अशी सर्वोच्च भागिदारी रचली आहे.

यामध्ये फखर जमानने द्विशतक करत 210 धावांची खेळी केली. यामध्ये 24 चौकार आणि 5 षटकारांची आतीषबाजी केली.

तर यामध्ये इमाम उल हकने 8 चौकारांच्या सहाय्याने 122 चेंडूत 113 धावा करुन बाद झाला.

यापूर्वी सलामीसाठी सर्वोच्च भागिदारी करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपुल थरंगा यांच्या नावे होता. जयसूर्या आणि थरंगाने 1 जुलै 2006 रोजी इंग्लड विरुद्ध 286 धावांची सलामीसाठी भागिदारी केली होती.

तब्बल 18 वर्षानंतर जयसूर्या आणि उपुल थरंगा यांचा विक्रम मोडण्यात  फखर जमान आणि इमाम उल हकला यश आले.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 1 बाद 399 धावा केल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमधील पाच सर्वोच्च सलामी भागिदाऱ्या-

फखर जमान-इमाम उल हक 304 वि. झिम्बाब्वे 2018

सनथ जयसूर्या-उपुल थरंगा 286 वि. इंग्लंड 2006

डेव्हीड वार्नर-ट्रेवीस हेड 284 वि. पाकिस्तान 2017

क्विंटन डी कॉक-हाशिम आमला 282 वि. बांगलादेश 2017

उपुल थरंगा-तिलकरत्ने दिलशान 282 वि. झिम्बाब्वे 2011

महत्त्वाच्या बातम्या-

-कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत

-रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment