पाकिस्तान सुपर लीग २०२२ (Pakistan super league 2022) स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जे भरपूर शेअर केले जातात. असाच काहीसा मजेशीर प्रकार या स्पर्धेतील ९ व्या सामन्यात घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या स्पर्धेतील ९ वा सामना, पेशावर जाल्मी (Peshawar zalmi) आणि लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने २९ धावांनी जोरदार विजय मिळवला. परंतु याच संघातील दोन दिग्गज खेळाडू मोहम्मद हफिज (Mohammad Hafeez) आणि फखर जमान (Fakhar Zaman) यांनी क्षेत्ररक्षण करताना असे काही केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर या दोघांना भरपूर ट्रोल केले जात आहे.(Mohammad Hafeez and Fakhar Zaman funny catch drop video)
पाकिस्तान खेळाडूंनी सोपे झेल सोडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावेळी देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. तर झाले असे की, पेशावर जाल्मी संघाची फलंदाजी सुरू असताना हैदर अली स्ट्राइकवर होता. हैदर अलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला आणि चेंडू उंच हवेत गेला. त्यावेळी मोहम्मद हफिज आणि फखर जमान झेल टिपण्यासाठी चेंडूच्या खाली आले होते.
जेव्हा दोन खेळाडू झेल टिपण्यासाठी एकत्र येत असतात, त्यावेळी दोन्ही खेळाडू एकमेकांना सांगतात की, नक्की झेल कोण टीपणार आहे. त्यानंतर दुसरा खेळाडू माघार घेत असतो. परंतु इथे असे काहीच पाहायला मिळाले नाही. दोघेही खेळाडू झेल टिपण्यासाठी धावले आणि गोंधळ झाला. दोघेही एकमेकांना आधळले आणि शेवटी झेल सुटलाच. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ :
Dropped! 😕#HBLPSL7 l #LevelHai l #PZvLQ pic.twitter.com/Y4Hok5eCtb
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 2, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लाहोर कलंदर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना, २० षटक अखेर ४ बाद १९९ धावा केल्या होत्या. यामध्ये फखर जमानने तुफानी ६६ धावांची खेळी केली. तर प्रत्युत्तरात पेशावर जाल्मी संघाला २० षटक अखेर ९ बाद १७० धावा करण्यात यश आले होते. हा सामना लाहोर कलंदर्स संघाने २९ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
शिखरचा १८ वर्षांपूर्वीचा ‘गब्बर’ विश्वविक्रम आजही अबाधित, वाचा काय होता ‘तो’ पराक्रम
आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात होणार ९४ सामने, बीसीसीआयची कमाई होणार दुप्पट; खेळाडूंना किती मिळणार?