पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर झमान याने शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक केली. उभय संघांतील हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. प्रथम फलंदाजी करताना रचिन रविंद्र याच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 400पेक्षा अधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात फखर जमान आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानला वेगवान सुरुवात मिळवून दिली.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघ या सामन्यात 6 विकेट्सच्या नुकसानावर 401 धावांपर्यंत मजल मारू शकला. रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने 94 चेंडूत 108 धावा केल्या. तर कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने 79 चेंडूत 95 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफिकी याने 9 चेंडूत 4 धावा करून विकेट गमावली. पण फखर जमान (Fakhar Zaman) याने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. पाकिस्तानसाठी हे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक देखील ठरले.
???? FASTEST WORLD CUP CENTURY FOR A PAKISTAN BATTER ????
9️⃣ sixes in his 63-ball ????! ????#NZvPAK | #CWC23 | #DattKePakistani pic.twitter.com/LWxmIKMKbB
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2023
दरम्यान, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाला फखर आणि बाबर यांनी वेगवान सुरुवात मिळवून दिली. पण पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पाकिस्तानची धावसंख्या 21.3 षटकांमध्ये 160 असताना मैदानात पावसाने हजेरी लावली. यावेळी फखर 106* आणि बाबर 47* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत.
(Fakhar Zaman reaches to 100 in 63 balls. Which is the fastest 100 for Pakistan in Cricket World Cup)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान – अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, हसन अली, मोहम्मद वसीम, उसामा मीर, शाहीन आफ्रीदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ‘पुढे कोणता संघ आहे याचा…’
विश्वकपमधून बाहेर पडल्यानंतर पंड्याची भावनिक पोस्ट, म्हणाला, ‘हे सत्य पचनी…’