आयर्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू असून या मालिकेतील मंगळवारी (१२ जुलै) झालेला दुसरा सामना न्यूझीलंडने ३ विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यादरम्यान एक प्रसंग घडला, ज्याने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे. आयर्लंडचा फलंदाज यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद झाला, ज्यानंतर पंचांनीही फलंदाजाला बाद दिले. मात्र त्यानंतर पंचांनी आपला निर्णय बदलला.
तर झाले असे की, आयर्लंडच्या डावातील ४३व्या षटकारदरम्यान हा प्रसंग घडला. यावेळी स्ट्राईकवर आयर्लंडचा सिमी सिंग (Simi Singh) होता. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर (Blair Tickner) हे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील एका चेंडू सिमी सिंगने पॉईन्टच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्न केला. परंतु चेंडू बॅटच्या कडेला लागून मागे यष्टीरक्षक टॉम लॅथम याच्या हाती गेला. यानंतर पंचांनी सिमी सिंगला बाद दिले.
परंतु सिमी बादचा निर्णय दिल्यानंतरही मैदानावरच उभा ठाकला आणि पंचांशी काहीतरी बोलू लागला. त्यांच्यातील चर्चा पूर्ण झाल्यानंतर पंचांनी त्यांचा निर्णय बदलला आणि सिमी सिंगला नाबाद जाहीर केले.
टॉवेल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवनदान
सिमी सिंगला नाबाद दिल्याचे कारण पुढे आल्यानंतर गोलंदाजासह दर्शकही चकित झाले. गोलंदाज टिकनरने घाम पुसण्यासाठी जो टॉवेल (Sweat Towel Falling) वापरला होता, तो कंबरेच्या मागे पँटमध्ये अडकवला होता. सिमी सिंगला गोलंदाजी करताना त्याचा हाच टॉवेल खाली पडला होता, ज्याबद्दल फलंदाज सिमी सिंगने पंचांशी तक्रार केली होती. त्याने तो चेंडू डेड चेंडू देण्याची मागणी केली होती, जी पंचांनी चर्चेनंतर मान्य केली. अशाप्रकारे एका टॉवेलमुळे फलंदाजाला जीवनदान मिळाले.
न्यूझीलंडने सामन्यात बाजी
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१६ धावाच केल्या आणि ४८ षटकातच त्यांचा संघ गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने फिन ऍलेन (६० धावा), कर्णधार टॉम लॅथम (५५ धावा) आणि मिचेल ब्रेसवेलच्या (४२ धावा) खेळींच्या जोरावर ३८.१ षटकातच सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वोत्तम बहुमान, जगातला नंबर ‘वन’! बुमराहची आयुष्यात कधीच विसरता न येणारी कामगिरी
‘आता काही दिवस फक्त रणजीच खेळ’, कोहलीला ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला
१० विकेट्सने सामना जिंकणे भारताच्या ‘बाए हाथ का खेल’, ‘एवढ्या’ वेळा केलीये ही कामगिरी






