---Advertisement---

भारतीय फुटबॉलचा व्यासंग जपणाऱ्या नोवी कपाडियांचे निधन, क्रीडा जगतावर शोककळा

On: गुरूवार, नोव्हेंबर 18, 2021 10:08 PM
---Advertisement---

प्रसिद्ध क्रीडा पत्रकार आणि समालोचक नोवी कपाडिया यांचे गुरुवारी (१८ नोव्हेंबर) निधन झाले. दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कपाडिया यांना फुटबॉलमधील तज्ञ म्हटले जायचे. त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील काम केले होते. याशिवाय कपाडिया यांनी अनेक पुस्तकेही लिहिली होती. त्यांनी बहुतेक पुस्तके फुटबॉलवर लिहिलेली. कपाडिया हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. कपाडिया एका महिन्याहून अधिक काळ व्हेंटिलेटरवर होते.

कपाडिया यांनी नऊ फिफा विश्वचषक स्पर्धेत पत्रकार म्हणून काम पाहिले होते. त्यांना भारतीय फुटबॉलच्या माहितीचा खजिना म्हटले जायचे. त्यांनी त्यांच्या बेअरफूट टू बूट्स, द मेनी लाइव्ह्स ऑफ इंडियन फुटबॉल या पुस्तकातून भारतीय फुटबॉलविषयी अनेक माहिती फुटबॉल प्रेमी आणि जगासमोर आणली होती होती. या दोन पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी ‘द फुटबॉल फॅनॅटिक इसेनशिअल गाईड बुक’ नावाचे मार्गदर्शक पुस्तक देखील लिहिले होते. अनेक दशकांपासून भारतीय फुटबॉल स्पर्धांमध्ये समालोचन करण्याव्यतिरिक्त कपाडिया यांनी आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि ऑलिम्पिक खेळांमध्येही समालोचन केले होते.

एआयएफएफने शोक व्यक्त केला

अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही कपाडिया यांच्या निधनावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “नोवी कपाडिया यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. ते प्रसिद्ध पत्रकार, समालोचक आणि फुटबॉल पंडित होते. भारतीय फुटबॉलची पत्रकारिता करताना त्यांनी दिलेले योगदान अभुतपुर्व असे होते.

बेंगलोर एफसीने शोक व्यक्त केला

भारतीय फुटबॉल क्लब बेंगळुरू एफसीनेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. क्लबने ट्विट केले आणि लिहिले की, “नोवी कपाडियांच्या निधनाची बातमी ऐकून बेंगलोर एफसी कुटुंबाला खूप दुःख झाले आहे. त्यांचा आवाज आणि भारतीय फुटबॉलविषयी उत्साह आपल्या हृदयात कायम राहील.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---