Chennai Super Kings: भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने मंगळवारी (9 जानेवारी) रोजी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. त्याच्या आणि साएसकेच्या एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करून त्याला प्रश्न विचारला. या प्रश्नाला आर अश्विननेही उत्तर दिले. अश्विनचे हे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, कारण त्यात त्याने महेंद्रसिंग धोनी याचा उल्लेख केला आहे. त्याने आपल्या कमेंटमध्ये धोनीला टॅगही केले आहे.
आर अश्विन (R Ashwin) याने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमचे आहेत. अश्विनने मद्रास क्रिकेट क्लबसमोर उभा असताना क्लिक केलेला फोटो पोस्ट केला. आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी जिथून आलो आहे,” या पोस्टवर अक्षय अरुण कुमार नावाच्या युजरने कमेंट केली की, “आम्ही तुला पिवळ्या जर्सीमध्ये कधी पाहू?” यावर अश्विन म्हणाला, “भाऊ हे फक्त धोनीलाच विचारले पाहिजे.”
View this post on Instagram
आर अश्विन चेन्नई सुपर किंग्जकडून बराच काळ खेळला आहे. त्याने 2009 मध्ये त्याच्या चेन्नईसाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो या संघासाठी सुमारे 10 हंगाम खेळला. मात्र, सीएसकेवर बंदी घातल्यानंतर तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही खेळला. तो दोन हंगामांसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चा भाग होता. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आणि आता तो राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.
अश्विनलाही त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायला आवडेल. चेन्नईत जन्मलेल्या अश्विनला त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना चेन्नईकडून खेळायला आवडेल. अश्विनने ज्या प्रकारे त्याच्या एका चाहत्याला प्रतिक्रिया दिली आहे. त्याला पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायचे आहे, असे त्यावरून दिसते. अश्विन अजूनही चेन्नईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. (Fan asks Ashwin when will he return to CSK? Taking Dhoni’s name, the spinner replied)
हेही वाचा
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 1: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच
अर्रर! टीम इंडियाला नडायला येणाऱ्या संघाची मदत करणार एक भारतीयच, सांगणार सगळी गुपीतं