सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्यावर कर्णधारपदावरून हटवले जाण्याची टांगती तलवार दिसत आहे. सध्या बाबर हा पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाण्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण चाहता सुरक्षेचा घेरा तोडून बाबर आझमला भेटण्यासाठी मैदानात उतरतो. त्यानंतर वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्या चाहत्याला वाचवून सर्वांची मने जिंकली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, संघाच्या सरावाच्या वेळी एक तरुण चाहता सुरक्षेचा घेरा तोडून मैदानात प्रवेश करतो. त्या चाहत्याने मैदानात प्रवेश करताच सुरक्षारक्षक त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. दरम्यान, रौफ मुलाकडे येतो आणि त्याला सुरक्षारक्षकापासून वाचवतो आणि चाहत्याला पुन्हा स्टँडमध्ये सोडतो. दरम्यान सुरक्षारक्षक रौफकडे येतो. मात्र, तो चाहत्याला त्याच्या हवाली करत नाही.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचे कृत्य पाहून मैदानात ‘हारिस-हारिस’चे नारे लागले. त्यानंतर संपूर्ण मैदान त्याच्या नावाच्या घोषणांनी दुमदुमले. हारिस हा प्रामुख्याने पाकिस्तानसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत 1 कसोटी, 37 वनडे आणि 72 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कसोटीत त्याने 1 बळी घेतला आहे. याशिवाय त्याने वनडे सामन्यात 69 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 102 विकेट्स घेतल्या आहेत.
Haris Rauf rescue a fan!!! Faisalabad crowd chanted “Haris Haris” the way he saved him. I love this respect increase ❤️ #ChampionsCup #PakistanCricket pic.twitter.com/CgVhguslMH
— Ahtasham Riaz (@ahtashamriaz22) September 8, 2024
पाकिस्तान क्रिकेट संघाला नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागला. बांगलादेशने त्यांना पाकिस्तानात जाऊन 2-0 अशा फरकाने पराभूत केले. यानंतर आता पाकिस्तान संघ आपली पुढील मालिका ऑक्टोबर महिन्यात खेळले. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर उभय संघांमध्ये वनडे आणि टी20 मालिकादेखील होणार आहेत.
हेही वाचा-
कोहली किंवा जो रूट नाही तर ‘हा’ बनेल कसोटीतील सर्वकालीन महान खेळाडू, गांगुलीची भविष्यवाणी
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!
एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला; या खेळाडूने केली बरोबरी