---Advertisement---

लवकर बरा हो दादा! आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनाईकने ‘अशी’ केली गांगुलीसाठी प्रार्थना, ट्विट व्हायरल

On: रविवार, जानेवारी 3, 2021 10:25 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. यानंतर अनेकांनी त्याच्या तब्येतीबाबत अपडेट घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कित्येक चाहत्यांनी ट्विटद्वारे त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यातही एका वाळू शिल्पकाराने (सँड आर्टिस्ट) गांगुलीसाठी वाळूत शिल्पाकृती उभारत प्रार्थना केली आहे. या कलाकाराचे नाव सुदर्शन पटनाईक आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे पटनाईक यांनी आपली प्रार्थना ‘दादा’पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी वाळूच्या साहाय्याने बॅट आणि चेंडूचे चित्र बनवलेले दिसत आहे. त्यावर नेहमी सुटाबुटात राहणाऱ्या गांगुलीचे चित्रदेखील आहे. सोबतच त्या बॅटच्या एका बाजूला मोठ्या अक्षरात “गेट वेल सून दादा (लवकर बरा हो दादा)”, असे लिहलेले आहे.

पटनाईक यांनी ओडिसाच्या पुरी बिचवर हे सँड आर्ट बनवले आहे. विशेष म्हणजे, पटनाईक हे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत. तसेच त्यांचे ट्विटर अकाउंट हे आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्टचे अधिकृत अकाउंट आहे.

सौरव गांगुलीच्या तब्येतीविषयी अपडेट

‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा गांगुली याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गांगुलीची पहिली अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला आहे.

तसेच, गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असून एका रक्तवाहिनीत ९० टक्के ब्लॉकेज असल्याचेही समजत आहे. सध्या सर्जरीनंतर गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट टाकले जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

अनेक राजकीय नेत्यांनी केली विचारपूस, चाहत्यांकडून प्रार्थना; सौरव गांगुलीच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट!

नक्की त्या चाहत्याने असे रोहित पंतच्या हाॅटेल बीलाचे पैसे दिले तरी किती?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---