भारत विरुद्ध इंग्लंड चालू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे दिवस-रात्र स्वरुपात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघ ११२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघ दिवसाखेर ३ बाद ९९ धावांवर आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहली फलंदाजी करत असताना एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानावर आल्याची घटना घडली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था तोडून मैदानावर पोहोचला. अचानक त्या चाहत्याला आपल्याकडे धावत येताना पाहून विराट दचकला आणि घाबरुन तो त्या अज्ञात चाहत्याला आपल्यापासून दूर राहण्यास सांगू लागला. त्या चाहत्यानेही विराटचे म्हणणे ऐकत लगेचच माघारी स्टँड्सच्या दिशेने धाव घेतली.
परंतु सुरक्षा व्यवस्था तोडून चालू सामन्यात व्यथ्य आणले आणि कोरोनाच्या काळात क्रिकेटपटूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याने त्या चाहत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अहमदाबाद स्टेडियमपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये त्या चाहत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=BnPLkt8zQSA&feature=youtu.be
https://twitter.com/aviirajput_/status/1364597195933032448?s=20
https://twitter.com/TrendingVirat/status/1364607828548153345?s=20
Fan breaches security to meet Virat Kohli#INDvsENG pic.twitter.com/qCF7QQn2hj
— Rohith (@Rohith_Crico) February 24, 2021
Fan tried to breach, but Virat Kohli reminded him of bio bubble! pic.twitter.com/DfjoOZFkBK
— Cheeru (@dfkmvirat) February 24, 2021
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा थोडक्यात आढावा
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंचा दबदबा दिसून आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडला अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकीपटूंनी ११२ धावांवर गारद केले. दरम्यान अक्षरने ६ तर अश्विनने ३ बळी मिळवले. इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्राउले सर्वाधिक ५३ धावा करू शकला.
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ३२.२ षटकात ९८ धावांवर भारतीय संघाला ३ धक्के दिले. तरीही सलामीवीर रोहित शर्माने नाबाद अर्धशतकी खेळी करत एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परिणामी पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ ३ बाद ९९ धावांवर आला आहे. आघाडी घेण्यासाठी त्यांना अवघ्या १३ धावांची गरज आहे. अशात दुसऱ्या दिवशी तगडी धावसंख्या उभारत इंग्लंडला दबावात अणण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अष्टपैलू युवराज सिंगवर अटकेची टांगती तलवार, सुप्रीम कोर्टात घेतली धाव; आज होणार सुनावणी
कुलदीपला वगळून वॉशिंग्टनला संधी का दिली? टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने सांगितले कारण