---Advertisement---

धवनसोबत धोका? केएल राहुल परतल्याने कॅप्टन्सीवरून हाकालपट्टी, अपमानावर भडकले चाहते

Shikhar-Dhawan-Fans-Reply
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला येत्या १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ दिवस आधीच १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. आता गुरुवारी (१२ ऑगस्ट) या संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे. दौऱ्यासाठी यापूर्वी घोषित झालेला कर्णधार शिखर धवनच्या जागी पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलची नियुक्ती केली गेली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर क्रिकेट चाहते चांगलेच भडकले आहेत. 

सलामीवीर केएल राहुलकडे (KL Rahul) आधीच आशिया कप २०२२ साठी (Asia Cup 2022) भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हर्नियाच्या दुखापतीमुळे तो दीर्घकाळ संघाबाहेर होता. आयपीएल २०२२ नंतर तो मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून आणि इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला होता. यानंतर, कोविड-१९ मूळे‌ तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भाग घेऊ शकला नव्हता. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यावरील (India Tour Of Zimbabwe) पहिल्या संघातही त्याला निवडण्यात आले नव्हते.

मात्र आता बीसीसीआयच्या(BCCI) वैद्यकीय पथकाने परवानगी दिल्यानंतरच राहुलचा संघातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ऐन दौऱ्याआधी बीसीसीआयने राहुलचे संघात पुनरागमन करत त्याच्यावर नेतृत्त्वपदाची जबाबदारीही सोपवली आहे. राहुल (Indian Team captaincy) कर्णधार असला तरीही, धवन संघात कायम असून तो उपकर्णधार असेल. राहुलच्या पुनरागमनाने भारतीय संघाचे चाहते खुश आहेत. परंतु बीसीसीआयने धवनसारख्या वरिष्ठ खेळाडूकडून नेतृत्त्वपद काढून घेतल्याने त्यांना राग अनावर (Fans Angry Over BCCI) झाला आहे.

ट्वीटरवर चाहते राग व्यक्त करत असून बीसीसीआयला ट्रोल करत आहेत. धवनसारख्या वरिष्ठ खेळाडूचा बीसीसीआयने सन्मान केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. 

https://twitter.com/APTalksCricket/status/1557757220116279297?s=20&t=aMCBm40jWVo3OsyteOoPiA

https://twitter.com/SportyVishal/status/1557750313318174722?s=20&t=0RLOj6ve_gDmCSuij6I5EA

https://twitter.com/Anubhav_Memerz/status/1557756880294154241?s=20&t=0Vvql6AsiiYZxXv889U8iQ

https://twitter.com/UnderarmBowler/status/1557748003728805888?s=20&t=N3vNn41SWxl7YWW-4Pagww

https://twitter.com/JonahAbraham26/status/1557750454867484672?s=20&t=gRIInAdiPqn7SOtIMWRqqg

https://twitter.com/KhairaSaket/status/1557755530835554304?s=20&t=EVY16gi5v5uv-vur-fs5Jg

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

स्लेजिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचे नवे रूप, श्रीलंकेला मदत करत जिंकली कोट्यवधी मने

रिषभने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीला केलं होतं ब्लॉक; आता ‘या’ सौंदर्यवतीवर ओवाळून टाकतो जीव

वाद चिघळला! पंतच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाचे प्रत्युत्तर; म्हणाली, ‘छोटू भैया, मी बदनाम व्हायला..’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---