भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात (Day-Night Test) खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला केवळ २५२ धावा करत्या आल्या. तसेच श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. मात्र, या सामन्यातील भारतीय संघाच्या संघ निवडीनंतर कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका होत.
या कारणाने होतेय टीका
I feel Siraj haven't been handled well in this new era of Indian Team, be it red ball cricket or the white ball season post the WI ODI series.
Khilana hi nahi tha toh atleast bio bubble break hi de dete. #CricketTwitter— animesh (@ani_meshh) March 12, 2022
बेंगलोर येथील या दिवस रात्र कसोटीसाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला. मोहाली कसोटीत खेळलेल्या जयंत यादव याच्या जागी दुसरा अष्टपैलू अक्षर पटेल याला संधी देण्यात आली. त्याच वेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला पुन्हा एकदा संघात संधी मिळाली नाही. याच कारणाने अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना लक्ष्य केले. ही जोडी सिराजचा आत्मविश्वास घालवत आहे, असे अनेक चाहते म्हणाले. आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर सिराज याला खेळण्याची संधी मिळायला हवी असे अनेकांनी म्हटले आहे.
Don't know why Rohit Sharma & Rahul Dravid duo benching Siraj.!The way he make a turnaround in his career from the 2020 IPL he should play atleast one match in the series.!
— Spidey! (@Cric_spidey) March 12, 2022
https://twitter.com/IndianHesson/status/1502556398768779268?t=sm6if-t4mD02mvEgfbntig&s=19
सिराजने केली देखणी कामगिरी
आयपीएल २०२० पासून सिराज अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. त्याच वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटी पदार्पण करताना चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर इंग्लंड व दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ कसोटीत ३६ बळी मिळवली आहेत. या कसोटीत संधी न मिळाल्याने आता सिराज सरळ आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसेल. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने रिटेन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)