पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. कोरोना व्हायरसचा पुण्यातील वाढता प्रभाव पाहाता या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना सामना प्रत्यक्ष पाहाण्याची मजा घेता येत नाही. पण असे असले तरी आपल्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील काही चाहत्यांनी अनोखी युक्ती वापरली आहे.
रविवारी (२८ मार्च) भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना होणार आहे. मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्याने हा सामना निर्णायक आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
त्यामुळे पुण्यातील काही चाहते या सामन्यासाठी भारतीय संघाला अनोख्या पद्धतीने प्रोत्साहन देताना दिसले. झाले असे की ज्यावेळी भारतीय संघ या सामन्यासाठी हॉटेलमधून स्टेडियमकडे बसमधून जात होता, तेव्हा बाणेरमधील राधा चौकात २ चाहते भारताचा तिरंगा फडकवताना दिसले. जेव्हा भारतीय संघाची बस राधा चौकात आली त्यावेळी या चाहत्यांनी हा तिरंगा फडकवला होता.
या घटनेचा व्हिडिओ प्रविण झिटे नावाच्या ट्विटरकर्त्याने शेअर केला आहे.
Best of Luck team India #rihitsharma #ViratKohli #IndiavsEngland #TeamIndia #HardikPandya #RishabhPant pic.twitter.com/duA3e2yRCV
— Pravin Zite (@PZite) March 28, 2021
इंग्लंडने जिंकली नाणेफेक
तिसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी १०३ धावांची सलामी दिली. मात्र, शिखर ६७ धावांवर आणि रोहित ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली ७ धावा करुन, तर केएल राहुल देखील ७ धावा करुन माघारी परतले. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १५७ धावा अशी असतानाच रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ महान अष्टपैलू क्रिकेटपटूने बरोबर ५७ वर्षापुर्वी घेतल्या होत्या ५ चेंडूत ५ विकेट्स…
अन् कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर झाला…
विराट कोहली परत एकदा टॉस हरल्यावर कर्णधार जोश बटलरच्या चेहऱ्यावरील हसू होतं पाहण्यासारखं