मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 12 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईमध्ये खेळला गेला. सामना पाहण्यासाठी केकेआरचे सह-मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दाखल झाला. नेहमीप्रमाणे किंग खान आपल्या संघाला प्रोत्साहन देत होता. त्यांच्यासोबत पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान देखील होते.
https://twitter.com/KKRiders/status/1311546494185467904
त्यांना कॅमेर्यावर पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सुरवात केली. काहींनी त्याच्या लूकबद्दल भाष्यही केले आहे. शाहरुखने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. त्याचा हा नवा लूक पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर एका चाहत्याने फोटो शेयर करत लिहले की “असा आहे किंग खानचा नवा लूक.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ” त्याचा लूक पाहून चाहते होतात घायळ.”
https://twitter.com/KamaleshArts/status/1311330347779371009
https://twitter.com/TeamSRKWarriors/status/1311323104589746178
https://twitter.com/tanish_rathod/status/1311326490399666182
https://twitter.com/SRKzAsmita/status/1311326488961011713
शिवम मावीच्या धारदार गोलंदाजीमुळे केकेआरने हा सामना 37 धावांनी जिंकला. कोलकाताने हा सामना जिंकताच कर्णधार दिनेश कार्तिक मैदानाबाहेर येऊन शाहरुख खानकडे इशारा केला. शाहरुख खानने प्रथम पाहिले आणि नंतर नमस्कार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.






