दुबई येथे आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 101 धावांनी विजय साजरा केला. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने झळकावलेले शतक भारतीय डावाचे वैशिष्ट्य राहिले. तब्बल 1020 दिवसांनी विराटने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्याच्या या शतकाबरोबरच त्याच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत अनेक चाहत्यांनी आहे त्या ठिकाणी या शतकाचा जोरदार जल्लोष केला.
भारतीय संघाचे आशिया चषकातील आव्हान पहिल्या दोन पराभवानंतर संपुष्टात आले होते. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना हा औपचारिक सामना होता. या सामन्यात विराट कोहली याने सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःचा हा निर्णय योग्य ठरवत पहिले आंतरराष्ट्रीय टी20 शतक पूर्ण केले. याचबरोबर त्याचे हे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. नोव्हेंबर 2019 नंतर प्रथमच त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक पूर्ण केले.
Luv u man @imVkohli ????❤️ pic.twitter.com/CEFtcyKw6u
— Super King (@Ake_133) September 8, 2022
जवळपास 2 वर्ष व 10 महिन्यांच्या या कालावधीत चाहते त्याच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, सातत्याने हे शतक विराटला हुलकावणी देत आले. अखेर अफगाणिस्तानविरुद्ध शतक पूर्ण होताच त्याच्या चाहत्यांनी तुफान जल्लोष केला. तमिळनाडूतील वेल्लोर या शहरातील व्हीआयटी कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये विराटचे शतक पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी विराटच्या नावाचा जयघोष केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी काही चाहत्यांनी थेट फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
Celebration for the 71st hundred of King Kohli. pic.twitter.com/AoqSC57i8x
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2022
विराटने आपल्या या खेळी दरम्यान अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर प्रतिक्षा संपली! ‘किंग कोहली’चे 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे






