---Advertisement---

ऑस्ट्रेलियात कोहलीला पाहण्यासाठी चाहते चक्क झाडावर चढले! VIDEO व्हायरल

On: गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024 8:53 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. कोहलीची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणतीही मर्यादा ओलांडण्यास तयार असतात. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाली.

सध्या विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी पर्थमध्ये सराव करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली नेट प्रॅक्टिस करत असल्याचं दिसतं. यावेळी चाहते विराटची एक झलक पाहण्यासाठी चक्क झाडावर चढतात. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

‘फॉक्स क्रिकेट’नं विराट कोहलीच्या नेट प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीशिवाय चाहतेही दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी काही चाहत्यांनी सर्व सीमा ओलांडल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स यावर सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

आज (14 नोव्हेंबर) विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ऑस्ट्रेलियात बालदिन साजरा केला. दोघांचा मुलांसोबत बालदिन साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो पोस्ट केला.

विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू 5 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. उभय संघांमध्ये 22 नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाईल. हा कसोटी सामना पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर खेळला जाणार आहे.

हेही वाचा – 

“गंभीर-रोहितचं विराटशी जमत नाही, भारत अवघ्या चार दिवसांत हरणार”; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन या लीगमध्ये खेळणार! प्रथमच होतंय आयोजन
कसोटी वाचवण्यासाठी कोणता भारतीय खेळाडू 11 तास फलंदाजी करू शकतो? कोच गंभीरनं दिलं अनोखं उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---