भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फॅन फॉलोइंग अर्थातच चाहत्यांची काही कमी नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. त्याच्याप्रती असणारे चाहत्यांचे प्रेम नेहमीच दृष्टीस आले आहे. जेव्हाही तो कुठेही जातो तेथे मोठ्या प्रमाणात चाहते त्याला पाहायला आलेले असतात. त्याच्या चाहत्यांची संख्या किती मोठी याचा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून दिसत आहे.
मंगळवारी (१६ ऑगस्ट) रोहित शर्मा (Rohit Sharma) याला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती. मुंबईतील एका हॉटेलमध्ये त्याला पाहण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीमुळे एका बसला देखील जाणे अशक्य होते. तसेच त्याला एकातरी चाहत्यासोबत फोटो काढणे अवघड होते. ही गर्दी पाहून तो पण हॉटेलच्या आत परतला. त्याचा हा व्हिडिओ एकाने ट्वीवटर पोस्ट केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
The crowd went out of control to see Indian cricket team captain Rohit Sharma in Mumbai on 15 August. But due to the crowd, Rohit had to go back to the hotel.#RohitSharma𓃵 @ImRo45 pic.twitter.com/dc7ACEdFjT
— Tanay Vasu (@tanayvasu) August 16, 2022
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामानंतर रोहितचा फिटनेस काही ठीक नाही. यामुळे त्याला अनेक सामन्यांना आणि मालिकांना मुकावे लागले आहे. आयपीएलनंतर त्याला इंग्लडच्या विरुद्ध ३ सामन्यांच्या टी२० मालिका आणि वेस्ट इंडिजच्या ४ सामन्यांच्या टी२० मालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली गेली. इंग्लंड दौऱ्यात त्याला कोरोना झाल्याने तो एकमेव कसोटीत खेळला नाही.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही विश्रांती दिली होती. तर टी२० मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. सध्या भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. यासाठीही त्याला संघातून वगळले असून संघ केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यामुळे रोहित आता थेट एशिया कप (Asia Cup) स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेळाडू सोडा आता तर थेट संघाच्या मॅनेजरमध्येच झाली हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांची मोठी चूक; माफी मागितली पण…