---Advertisement---

अरे पॉली इतकी घाई! शमीने चेंडू टाकण्यापुर्वीच क्रिज सोडून पळाला पोलार्ड, चाहत्यांनी घेतली शाळा

---Advertisement---

आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार (23 एप्रिल) रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर नऊ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करता उतरलेल्या मुंबई संघाने कर्णधार रोहित शर्माच्या 63 धावांच्या खेळीमुळे निर्धारित 20 षटकांत 131 धावांपर्यंत मजल मारली. परंतु मुंबई संघाची फलंदाजी चालू असताना या संघातील अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने चेंडू टाकण्याअगोदरच सीमारेखा ओलांडल्याने सध्या तो चर्चेत आला असून त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.

या सामन्यातील पंजाब किंग्जचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या षटकात मुंबईच्या पोलार्डने धाव घेण्यासाठी चेंडू फेकण्याआधीच क्रिजवरील रेखा ओलांडली. त्यामुळे पुन्हा एकदा फलंदाजाच्या या कृत्याबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

https://twitter.com/paulmwatson/status/1385620765261828101?s=20

https://twitter.com/paulmwatson/status/1385620765261828101?s=20

https://twitter.com/NutanShelar/status/1385619688227364867?s=20

https://twitter.com/Abhicricket18/status/1385620464148500481?s=20

या अगोदर चेन्नई सुपर किंग्जमधील ड्वेन ब्रावोनेही असे कृत्य केले होते. तेव्हाही याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा व्यंकटेश प्रसाद यांनी ‘मांकडींग’ प्रक्रियेद्वारे बाद करण्याचा गोलंदाजाला पूर्ण अधिकार असावा या नियमाचे समर्थन केले होते.

आता पुन्हा एकदा पोलार्डने या सामन्यातील शेवटच्या षटकांत मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर हे कृत्य करून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या अगोदर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने हे कृत्य केले असता पोलार्डने त्याला ‘मांकडींग’ नियमानुसार बाद करण्याची सुचना दिली होती. आता पुन्हा हीच कृती पोलार्डने केल्याने त्याच्यावरती टीका केली जात आहे.

या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने शेवटच्या काही षटकांमध्ये स्फोटक फलंदाजी करून धावसंख्या वाढवण्याचा प्रयास केला. परंतु मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केल्याने पोलार्डला जोरदार फटके मारता आले नाहीत. त्याने या सामन्यात 12 चेंडूत 16 केल्या. ज्यामध्ये त्याला फक्त एकच षटकार मारता आला.

महत्त्वाच्या बातम्या-

PBKSvMI: दारुण पराभवानंतर कर्णधार रोहितने टोचले फलंदाजांचे कान, म्हणाला…

‘युनिव्हर्स बॉस’चा ९३ मीटरचा गगनचुंबी षटकार, प्रशिक्षक जागचे उठले अन्… बघा झक्कास व्हिडिओ

‘बॉल सुखा है, घूम रहा है’; जेव्हा लाईव्ह सामन्यात रोहित गोलंदाजाला देतो धडे, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---